टिपा लिया
१ ) कोल्हापूरचे लोकजीवन
Answers
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी ठिकाणे आहेत. [शाहू महाराज छत्रपती शाहूमहाराजांच्या] काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे मोलाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो. येथे गुळ संशोधन केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर,स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी.पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ४०० कारखाने इथे आहेत.कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे.
आम्ही आशा करतो की आपण या उत्तरास मदत केली असेल.