तिसऱ्या टप्प्यात बदलत्या घटकांच्या विपुलतेने सीमांत उत्पादकता... होते
Answers
Answer:
उत्पादकता : साधनसामग्रीचे वस्तूंत रूपांतर करण्याची उत्पादक घटकांची कार्यक्षमता. एखाद्या निवेशाच्या (इन्पुट) एककाचा एका ठराविक काळातील उत्पाद (आउटपुट) असाही उत्पादकतेचा अर्थ लावला जातो. मजुराच्या बाबतीत तो दरवर्षी, दरमहा वा दरताशी किती उत्पाद निर्माण करतो, हे पाहिले जाते.
जेव्हा एखाद्या उत्पादक घटकाची उत्पादकता वाढते, तेव्हा निवेशाच्या एककापासून अधिक उत्पाद उपलब्ध होतो; म्हणजे तोच उत्पाद मिळविण्यासाठी निवेशाचे प्रमाण कमी करून भागण्यासारखे असते. या परिस्थितीत निवेशाची किंमत तीच राहिली, तर उत्पादाच्या परिव्ययात घट होईल, हे उघड आहे. एखाद्या देशातील साधनसामग्रीची उत्पादकता वास्तव परिव्ययाची पातळी निश्चित करते आणि अपेक्षित फलनिष्पत्तीसाठी विशिष्ट साधनसामग्री किती प्रमाणात उपयोगात आणावी हे ठरविते. अधिक उत्पादक असलेला एखाद्या देशातील मजूर, दुसऱ्या देशातील कमी उत्पादक मजुराहून जादा वेतन मिळवितो, तेव्हा त्या जादा वेतनामुळे परिव्ययात वाढ होत नाही. पश्चिम यूरोप आणि उत्तर अमेरिका या भागांतील वाढत्या राहणीमानाचा इतिहास म्हणजे तेथे झपाट्याने वाढलेल्या उत्पादकतेचाच इतिहास होय.
Explanation:
hope it will be help you