तुषार सिंचनाचे कार्य कसे चालते.
Answers
Answer:
gkihtतुषार सिंचनाचे कार्य कसे चालते
अॅल्युमिनीअम अगर पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते. त्यास तुषार सिंचन पद्धत असे म्हटले जाते. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.
याही पद्धतीची काही वैशिष्टये आहेत१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.
२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.
३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.
४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते.
५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.
६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.
७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.
८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.
९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.
१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..
११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.
१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.
१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀