History, asked by YashodhanChavan, 1 year ago

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो

Answers

Answered by chittichinna
11
Marathi Fonts" हा गुगल शोधयंत्रात महाराष्ट्रातील लोकांकडून सर्वाधिक शोधला जाणारा शब्द समुह आहे.या लेखात फॉण्ट (Font) या इंग्रजी शब्दाला मराठीत टंक असा प्रतिशब्द वापरला आहे. संगणकपूर्व काळात टंकलेखन हेटंकलेखनयंत्र वापरुन किंवा खिळे जुळवून केले जात असे. कॅरॅक्टर एनकोडिंगच्या साहाय्याने संगणकावर टंकलेखन शक्य झाले.तरीसुद्धा सुरवातीच्या कालावधीत ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउजरच्या तांत्रिक मर्यांदांमुळे संगणकावर व इंटरनेटवर भारतीय भाषांचा उपयोग फारच मर्यादित राहिला. यातच संगणकशिक्षित भारतीय लोक मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर करत. तसेच भारतीय भाषासाठीच्या संगणकीय टंकांकरिता मोजावी लागणारी किंमत, वापर सुरू करण्याकरिता करावी लगणारी क्लिष्ट प्रक्रिया, दर संगणकीय टंकासोबत बदलणारे कळपाटाचे आराखडे यामुळे पण भारतीय भाषांच्या संगणकीय टंकांचा वापर कमी राहिला आहे.[१],[२]


व्यापारी तत्त्वावर मॉड्युलर सिस्टिम, सिडॅक, आयट्रांस आणि इतर छोट्या मोठ्या आस्थापनांनी संगणकीय टंक भारतीय भाषांत उपलब्ध करून दिले. काही संकेतस्थळांनी टंक प्रत्येक वेळी डाउनलोड करण्याच्याऐवजी आपोआप डाउनलोड होणारे डायनॅमिक संगणकीय टंक व भारतीय भाषात ईमेल, चॅट सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. पण बहुसंख्य सामान्य माणसांच्या दृष्टीने संगणकावरील भारतीय भाषातील टंक संगणकावर सुलभ पद्धतीने आणि कुठल्याही कार्यक्रमात वापरता येतील असे नव्हते.

खरी क्रांती Windows 98 ही ऑपरेटिंग सिस्टिम मागे पडून व वाढत्या आधुनिक युनिकोड पद्धतीच्या विनामूल्य टंकांमुळे, काही मुक्त तंत्रांश, युनिकोड वापरता येतील अशी संकेतस्थळे इत्यादींमुळे नजरेच्या टप्प्यात आली आहे.

अजूनसुद्धा बहुसंख्य भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेतील टंक वापरण्याकरिता किमान काही तांत्रिक संज्ञा माहीत असणे श्रेयस्कर ठरते.

Similar questions