तो उत्तीर्ण झाला. सर्वांना आनंद झाला. ( केवळ वाक्य लिहा )
Answers
Explanation:
) खालील वाक्यांपुढील कंसातील सूचनेप्रमाणे कृती करून लिहा.
१)तो उत्तीर्ण झाला, सर्वाना आनंद झाला. (केवल वाक्य करा.)
केवल वाक्य-
२)मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले. की मी दिल्लीला जाईन. (वाक्यप्रकार ओळखून लिहा)
य) केवल वाक्य र)मिश्रवाक्य ल) संयुक्त वाक्य
वाक्यप्रकार-
Answer:
तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.
Explanation:
केवल वाक्य-
जेव्हा वाक्यात एकच कर्ता व एकच क्रियापद असते, व वाक्यातून एकच उद्देश दर्शविला असेल तर त्याला केवल वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
२. गुरुजी वर्गात येताच मुले उभी राहिली.
३. शाळेची घंटा वाजताच मुले बाहेर आली.
४. शाळेचा निकाल लागताच मुले आनंदाने नाचू लागली.
५. निवडणुका जाहीर होताच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली.
वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की वाक्यात एकच कर्ता व एकच क्रियापद असेल तर त्याला केवल वाक्य असे म्हणता येईल.