Music, asked by sanchityengantiwar, 10 months ago

तक्रार पत्र in Marathi​

Answers

Answered by shreyas200792
3

Answer:

अनियमित वीजपुरवठ्याबाबत विभागीय अधिकारी, महाराष्ट्र वीज मंडळ, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज लिहा.

वासुदेव स्वामी

मु.पो. वानवडी,

जिल्हा- पुणे.

विषय – अनियमित वीजपुरवठ्याबाबत तक्रार पत्र.

माननीय महोदय,

मी वानवडी गावात राहणार एक नागरिक आहे. सतत १५ दिवसांपासून आमच्या गावात अनियमित वीजपुरवठा होत आहे. दररोज वीज जाते. त्यामुळे रात्री खूप समस्या निर्माण होतात. विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हैराण झाले आहेत.

सरकारी कार्यालय, बँकेतील संगणकीय व्यवहार ठप्प आहेत. दवाखाने, रुग्णालयातील आजारी व्यक्तींना खूप त्रास होत आहे. गिरण्या व कारखाने हे विजेवर अवलंबून असतात तेही १५ दिवसांपासून बंद आहेत. आम्हा सर्व सामान्य गावकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.

तरी आपणास नम्र विनंती आहे की परिस्थितीची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला विश्वासू,

वासुदेव स्वामी

Explanation:

Hope this helps you pls Mark as Brainliest

Similar questions