तलाठी कोणता उतारा देतो?
Answers
Explanation:
महाराष्ट्रातील तलाठी यांना अधिकार नसल्याने त्यांनी खालील ३६ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे.
वारस नोंदी प्रमाणपत्र, वारस नोंद पंचनामा, वारसाचा दाखला, वारस अहवाल, वंशावळ पंचनामा, रक्तनातेसंबंधाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, अल्पभूधारक असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, एकत्र कुटुम्बाचे प्रमाणपत्र, विभक्त कुटुम्ब असल्याचा दाखला, विधवा-परित्यक्ता असल्याचा दाखला, पुनर्विवाह न केल्याचा दाखला, अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, नगरपालिकेत हद्द असल्याचा, नसल्याचा दाखला, विद्युत जोडणी ना हरकत दाखला, विद्युतपम्प असल्याचा वा नसल्याचा दाखला, मालकीच्या शेतात विहीर आहे किंवा नाही याचा दाखला, ५०० फुटाच्या आत विहीर असल्या-नसल्याचा दाखला, शेतातील वृक्षांबाबत, भिक्षुक नसल्याबद्दल, धर्मादाय संस्थांकडून मदत घेत असल्या-नसल्याबाबात, जातीचा दाखला, कायदेशीर सज्ञान- अज्ञान असल्याचा दाखला, चल-अचल सम्पत्तीचा दाखला, दोन नावांची व्यक्ती एकच असल्याबाबत, जमिनीच्या घराच्या चतुःसीमा. शेतजमीन नकाशा, जमिनीच्या किंमतीचा पंचनामा, बागायत प्रमाणपत्र, मयत व्यक्ती ही कुटुम्बातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचा दाखला, मयत व्यक्ती कुटुम्बप्रमुख असल्याचा दाखला,आदी ३६ प्रकारचे दाखले.
नियमाप्रमाणे आता तलाठी सातबारा उतारा ८ अ उतारा तसेच फेरफार उतारा याच्या प्रमाणित प्रती देतात.