History, asked by krushnadeshmukh672, 8 months ago

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यामातुन
भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मला
यांच्या जतनाचे प्रयत्न करते

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

भारतीय टपाल व तार विभाग : टपाल सेवा व संदेशवहन सेवा उपलब्ध करणारी भारत सरकारची यंत्रणा. भारतीय टपाल व तार विभाग हा केंद्रीय दळणवळण मंत्रलयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येत असून या विभागाचा सर्वाधिक रोजगार पुरविणाऱ्या निगमांमध्ये दुसरा क्रमांक लागतो. टपाल व तार विभागाचा सचिव हा टपाल व तार कार्यालयाचा महानिदेशक, तसेच टपाल आणि तार मंडळाचा अध्यक्ष अशी दोन्ही पदे सांभाळतो. ३१ मार्च १९८१ रोजी या मंडळाकडे ८.५२ लक्ष लोक काम करीत होते.

भारतीय टपाल व तार विभाग : टपाल सेवा व संदेशवहन सेवा उपलब्ध करणारी भारत सरकारची यंत्रणा. भारतीय टपाल व तार विभाग हा केंद्रीय दळणवळण मंत्रलयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येत असून या विभागाचा सर्वाधिक रोजगार पुरविणाऱ्या निगमांमध्ये दुसरा क्रमांक लागतो. टपाल व तार विभागाचा सचिव हा टपाल व तार कार्यालयाचा महानिदेशक, तसेच टपाल आणि तार मंडळाचा अध्यक्ष अशी दोन्ही पदे सांभाळतो. ३१ मार्च १९८१ रोजी या मंडळाकडे ८.५२ लक्ष लोक काम करीत होते. इतिहास : भारतात १७६६ साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. १५८२ मध्ये पहिले टपाल तिकिट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले, तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४ मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सु. ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या. १८८० साली धनप्रेष सेवा (मनीऑर्डर सेवा) चालू करण्यात आली. १८८२ हे वर्ष म्हणजे भारतीय टपाल कार्यालयाच्या कारकीर्दीतील अतिमहत्त्वाचे वर्ष मानले पाहिजे कारण त्या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. १९८३ साली भारतीय टपाल व तार विभागाने डाकघर बचत बँकेची शताब्दी साजरी करण्यास प्रारंभ केला. रेल्वे-डाक-सेवा व हवाई-डाक-सेवा अनुक्रमे १९०७ १९११ साली सुरू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत टपालयंत्रणेत लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळते. १९५१ ते १९८१ या अवधीत डाकघरे व तारायंत्र कार्यालये यांची संख्या चौपाटीने, तर दूरध्वनीची संख्या १७ पटींनी वाढली. ग्राहक-थेट-तबकडी-सेवा (सब्स्क्रायबर ट्रंक डायलिंग सिस्टिम-एसटीडी.) १९६० मध्ये सुरू करण्यात आली असून सांप्रत ती १९८ शहरांत प्रचलित आहे. समुद्रपार संदेशवहन सेवाद्वारे भारताचा जगातील जवळजवळ सर्व देशांशी संपर्क साधण्यात आला आहे.

Similar questions