टप् टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे आमुचे जुळे !
कुरणावरती,झाडांखाली ऊनसावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा,गवत खुशीने डुले!
दूरदूर हे सूर वाहती,उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती,फांदीवरती हा झोपाळा झुले!
गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस,वारा,मोरपिसारा या गाण्यातून फुले!
फुलांसारखे सर्व फुला रे, सुरात मिसळुनि सुर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे !
3) कवितेत आलेले निसर्गाचे घटक लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
कवितेत आलेले निसर्गाचे घटक:
- प्राजक्ताची फुले
- झाड
- वारा
- गवत
- फांदी
- तारा
- पाऊस
- मोरपिसारा
Similar questions