थांबला तो संपला कल्पनेचा विस्तार करा
Answers
एक प्रवासी भटकंती करीत खूप दूरवर पोहोचला. तो खूप थकला होता. एक झाडाखाली वृद्ध गृहस्थ बसलेले त्याला दिसले. तो त्यांना म्हणाला, 'बाबा हा रस्ता कुठे जातो?' त्या बाबांनी काही उत्तर दिले नाही. त्याने दोन-तीन वेळा तोच प्रश्ान् विचारला. पण आजोबांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव उमटले नाहीत. त्यांना विचारण्यात काही अर्थ नाही, असं वाटून प्रवासी पुढे चालू लागला. आठ-दहा पावलं चालून गेल्यावर, ते आजोबा जोरात हाक मारीत असल्याचे त्याला जाणवले. तो चमकला. आजोबांना म्हणाला, 'का बरं हाक मारलीत?' आजोबा म्हणाले... हा रस्ता अमुक अमुक ठिकाणी जातो.' त्यांचे शब्द ऐकून प्रवाशाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आपल्या प्रश्ानचं उत्तर आता देण्याचं कारण काय, असे विचारले असता आजोबा म्हणाले, 'तू मला विचारत होतास, रस्ता कुठे जातो...तेव्हा मी तुझ्या पावलांकडे बघत होतो. तुझी पावलं पुढे चालण्यास राजी नाहीत...ती थांबलेली आहेत असे मला दिसले...पण ज्या क्षणी तू चालू लागलास... त्याचवेळी मला जाणवलं की, आता तुझी पाऊलं पुढे चालण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे आता मी तुला रस्त्याची व तुला हव्या त्या गावाला जाण्याची दिशा सांगू इच्छित आहे.
या संदर्भात माधव ज्यूूलियनांची कविता आठवते...
- धावत्याला शक्ती येई
- आणि मार्ग सापडे
- भ्रांत तुम्हा का पडे?
सतत प्रयत्नशील असणं हे किती महत्त्वाचं आहे, हे यावरून कळावं. जीवननौका पुढे नेण्यासाठी हात-पाय हलवीत राहणं...चालवीत राहणं...वल्हवीत राहणं आवश्यकच आहे, पण पुढे जाण्याची उत्कट इच्छा असणं, अधिक महत्त्वाचं! त्यामुळेच तर यशप्रप्ती होते. एकदा घराबाहेर पडलं की बाह्यजगतातील प्रतिकूलतेवर, टक्क्याटोणप्यांवर मात करीत जाता येतं. वारा-वादळ-वावटळ सोसण्याचं बळ येत जातं.
डिमेटर नावाची ग्रीक देवता, बाळ जन्माला आलं की, त्याला निखारा दाखवते. अशासाठी की, त्याने आपल्या आयुुष्यातील, भविष्यातील अग्निपरीक्षेला तोंड देण्यास तयार व्हावं. आदिवासींमध्येही अशी एक प्रथा आहे, की मूल जन्मास आल्यावर त्याला वाहत्या पाण्यात बुडवतात...संसार सागरात त्याला तरता-तरंगता यावं, आपला जीव जगण्यासाठी, पाण्यात हातपाय मारता यावेत म्हणूनच असं केलं जात असावं.