Hindi, asked by shukreharish, 5 months ago

थोडक्यात माहिती लिहा.
(१) सरपंच
(२) मुख्य कार्यकारी अधिकारी​

Answers

Answered by jsanket0038
13

सरपंच

ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.

Answered by shindevikas741
1

Answer:सरपंच-

ग्रामपंचायतीच्या निवडणूका दर पाच वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो.

मुख्य कार्यकारी अधिकारी-

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो . तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आय. ए. एस. दर्जाचा अधिकारी असतो . त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

Similar questions