थोडक्यात टिपा लिहा :
(1) राष्ट्रवादी इतिहासलेखन
Answers
Answer:
आपल्या राष्ट्रासाठी जे इतिहासलेखन केले गेले, त्याला 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
Explanation:
१. भारतात एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी शिक्षणपद्धती सुरू केली. ही शिक्षणपद्धती इंग्रजी शिक्षणपद्धती होती.
२. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना आपल्या देशाच्या संस्कृतीचे महत्त्व व वैभव लक्षात आले.
३. अशा आत्मजाणीव झालेल्या इतिहासकारांनी जे इतिहासलेखन केले, त्याला 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
४. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिला होता. अशा इतिहासलेखनाला त्यांनी विरोध केला.
५. भारतीय इतिहासातील तथ्य व सुवर्णकाळ त्यांनी वर्णन केला.
६. मात्र, हे करताना काही वेळा त्यांच्याकडून वास्तवाकडेही दुर्लक्ष झाले.
संकल्पना:
पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन:
जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे ऐकून तिसऱ्या व्यक्तीबद्दल त्याचे मत बदलतो, तेव्हा त्याला 'पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन' असे म्हणतात.
उदा.,
A, B आणि C हे तीन मित्र आहेत.
B च्या मनात C विषयी चांगले विचार आहेत.
A ने B ला C विषयी खोटे वाईट विचार सांगून त्याचे मतपरिवर्तन केले.
म्हणजेच, आता B चा C विषयी 'पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन' झाला.
Explanation:
राष्ट्रवादी इतिहास लेखन