History, asked by lokeshmarwade79, 3 months ago

थोडक्यात टिपा लिहा- (
१) विश्वकोश

Answers

Answered by sachiw270
8

Answer:

दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेच्या विकासाची नवी दालने खुली झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि ज्ञाननिर्मिती यांचा विकास करण्याकरिता जी अनेक पावले उचलली, त्यांतले महत्त्वाचे पाऊल म्हणजे दि. १ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना. आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचे जग म्हणून ओळखले जाते. यामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार या तिन्हीं गोष्टींचा समावेश होतो. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मानव्यविद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन ज्ञानशाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यावी हे विश्वकोशाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या मंडळाकडून मराठी विश्वकोशाच्या नऊ खंडांचे प्रकाशन करण्यात आले.

पुढे विश्वकोशाच्या कामाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन दि. १ डिसेंबर १९८० रोजी साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन आणि प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली. या आधी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा अनेक शास्त्रांचे ज्ञान मराठी भाषेतून करून देणारा प्रकल्प श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी स्वबळावर हाती घेऊन पूर्ण केलेला आहे.

Explanation:

तुमचे पॉईंट्स करून पण लिहू शकता।

Answered by tripathiakshita48
0

विश्वकोश हे एक व्यापक संदर्भ कार्य आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती असते. लोकांना स्वारस्य असलेल्या जवळजवळ कोणत्याही विषयावर तपशीलवार आणि अचूक माहिती प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

विश्वकोश इतिहास, विज्ञान, साहित्य, भूगोल आणि बरेच काही विषय समाविष्ट करू शकतात.

विश्वकोश सामान्य किंवा विशेष असू शकतात आणि ते प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपात आढळू शकतात. एखाद्या विशिष्ट विषयावरील संशोधनासाठी ते सहसा प्रारंभ बिंदू म्हणून वापरले जातात. विश्वकोशातील लेख त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांद्वारे लिहिलेले असतात आणि ते सामान्यत: वर्णक्रमानुसार आयोजित केले जातात.

सर्वात प्राचीन ज्ञात ज्ञानकोश प्राचीन ग्रीक लोकांनी लिहिला होता आणि कालांतराने, अनेक भिन्न संस्कृतींनी त्यांचे स्वतःचे ज्ञानकोश तयार केले आहेत. आज, काही सुप्रसिद्ध ज्ञानकोशांमध्ये विकिपीडिया, ब्रिटानिका आणि वर्ल्ड बुक यांचा समावेश आहे. डिजिटल संसाधनांनी मोठ्या प्रमाणावर मुद्रित ज्ञानकोशांची जागा घेतली आहे, परंतु ही कामे संशोधकांसाठी आणि विविध विषयांवर त्यांचे ज्ञान वाढवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान साधन आहे.

विश्वकोशावरील अशा अधिक प्रश्नांसाठी
https://brainly.in/question/6847369
#SPJ3

Similar questions