Music, asked by kadampranjal45, 6 months ago

३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(E) विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास
आली?
(२) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?
सा(३) मुघलाना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे
का अशक्य झाले?
४. तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा.
(१) कृष्णदेवराय
(२) चांदबिबी
(३) राणी दुर्गावती​

Answers

Answered by ankitaadsul1011
3

प्रश्न 3रा) थोडक्यात उत्तरे लिहा...

1) विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली?

उत्तर : दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत त्याच्याविरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले.

या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क याने 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले.

हसन गंगू या सरदारानेही तुघळकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इ.स. 1347 मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले.

2) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या?

उत्तर : महमूद गावानने राज्यात पुढील सुधारणा केल्या ---

जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली.

राज्यात आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले.

अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली.

सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली.

सैन्यामध्ये शिस्त आणली.

3) मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले?

उत्तर : औरंगजेबाच्या मुगल सैन्याने आसाम मधील आहोमाच्या प्रदेशावर आक्रमण केले.

गदाधरसिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आहोमानी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.

अहोमानी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाम मध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.

प्रश्न 4था) तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा...

1) कृष्णदेवराय ---

उत्तर : इसवीसन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवरायाने विजयवाडा व राजमहेंद्री प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला.

बहमनी सुलतान महमूदशहा यांच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या संघाचा पराभव केला.

विद्वान असलेल्या कृष्णदेवाने तेलगू भाषेत अमुक्तमाल्यादा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला.

त्याच्या काळातच विजय नगर मधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.

2) चांदबिबी---

उत्तर : चांदीबिबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी.

इसवी सन 1595 मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाही वर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला.

तेव्हा चांदबिबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला.

परंतु निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटीर सरदारांनीच चांदबिबी ठार केले त्यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला.

3) राणी दुर्गावती

उत्तर : चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवन ची राणी होती.

तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाल लढा दिला.

पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला. या लढाईत तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली.

Similar questions