History, asked by zameer3986, 1 month ago

था. हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन तुमच्या शब्दात स्पष्ट करा.​

Answers

Answered by bdhyanam18
0

हडप्पा संस्कृती (इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले.[१] हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत. [२]

Similar questions