दुकानातून शाळेच्या ग्रुंिालयासाठी पुस्तकाुंची मागणी करणारेपत्र वलहा
Answers
Explanation:
ग्रंथपाल
सरस्वती विद्या मंदिर,
टिळक नगर, डोंबिवली(पूर्व)
दिनांक ६ सप्टेंबर , २०२०
प्रति,
माननीय व्यवस्थापक
आयडियल बुक डेपो
दादर, मुंबई – ४०००२८
विषय – पुस्तकांच्या मागणीबद्दल पत्र.
माननीय महोदय,
आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपल्याकडून काही पुस्तके मागविण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे. सोबतच ७०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवत आहे. उरलेली रक्कम नांतर पाठवू. पुस्तकांच्या किमतीवर योग्य ती सवलत देण्याची कृपा करावी.
पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव लेखक प्रति
१. श्यामची आई साने गुरुजी १०
२. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक २०
३. कलिका वि.स. खांडेकर १५
४. व्यक्ती आणि वल्ली पु.ल. देशपांडे १०
५. विशाखा कुसुमाग्रज १५
६. बटाट्याची चाळ पु.ल. देशपांडे २०
आपणास नम्र विनंती आहे की लवकरात लवकर पुस्तके पाठविण्याची कृपा करावी तसदीबद्दल क्षमस्व. मराठी पत्रलेखन कसे करावे? प्रकार, मायना, नमुना, उदाहरणे, विषय
आपला कृपाभिलाषी,
ग्रंथपाल प्रमुख
(सरस्वती विद्या मंदिर)
मी आशा करतो कि तुम्हाला हे पत्र आवडले असेल. जर ह्या लेखामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत झाली असेल तर कृपया खाली कंमेंट सेकशन मध्ये तूच विचार कळवा. धन्यवाद.