दिलेल्या चार शब्दाच्या आधारे गोष्ट लिहा:- पाऊस, डोंगर, घर, बैल. please write in marathi
Answers
Answer:
मल को लेकर अ धक gunon yehw
Answer:
मेहनती गजानन
एकदा एका गावात एक गजानन नावाचा शेतकरी राहत होता. तो खूपच मेहनती होता दिवस-रात्र शेतात काम करायचा आणि आपला कुटुंब चालवायचा. गावाच्या शेजारी एक डोंगर होता आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी गजानन चे घर होते.
सर्वकाही व्यवस्थित चालले होते परंतु हे येणारे वर्ष त्याच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार याची त्याला कल्पनाही नव्हती. वर्षाच्या सुरुवातीला आज गजानन ने आपल्या शेतात बीज पेरले. आणि तो पावसाची वाट बघू लागला. या वर्षी मात्र पावसाने दगा दिला आणि पाऊस आलाच नाही. जमिनी टाकलेले सर्व बीज मरून गेले. पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण परिसरात पाण्याचे हाल होऊ लागले.
फक्त मनुष्यच नाही तर खान यांना देखील खायला गवत न मिळाल्यामुळे त्यांचे हाल होऊ लागले. गजानन कडे बैल होते परंतु खायलाच काही मिळत नसल्यामुळे एक बैल अचानक मरण पावला. संपूर्ण गाव काळजीत पडले व हळूहळू ते गाव सोडून जाऊ लागले. परंतु गजानन ला स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास होता तो म्हणाला सर्व गाव जरी गेले तरी मी मात्र येथून जाणार नाही.
दररोज पावसाची वाट बघत तो आपल्या शेतात जात असे व काहीतरी काम करत असे. शेवटी देवाला दया आली आणि त्यादिवशी धो-धो पाऊस झाला. गजानन खूपच आनंदी झाला. पुन्हा जोमाने तो शेतात काम करू लागला व आपले माळरान फुलू लागला. हळूहळू गावातील लोकही परत आले आणि पुन्हा एकदा ते गाव सजले.