India Languages, asked by nyarif2205, 5 months ago

दिलेल्या शब्दांनी बातमी तयार करा. कचरा भुमि,टन,प्रदूषण, साठवतात,दूर्गंधि​

Answers

Answered by shravanipendhari
12

Answer:

कचराभूमी वाहतेय ओसंडून....

आमच्या वार्ताहराकडून

सातारा, दि. १६ जुलै : पाटण शहरातील कचरा घेऊन आलेले डम्पर आज पंधराव्या दिवशीही तसेच शहरात परतले. पाटण शहरातील कचरा लगतच्या गावात साठवण्यात येतो. म्हणून लगतच्या तीन चार गावांतील लोक प्रचेंड सतप्त झाले होते. त्यांनी उग्र आंदोलन केले. शहरातील लोकांनी शेजारची गावे कचराभूमी बनवल्यामुळे येथील लोक रोगराईने हैराण झाले आहेत. अर्जविनंत्या करून काहीच साधत नसल्याने लोकांनी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

पाटण शहरातील कचऱ्याचा भार लगतच्या गावांवर टाकण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे या गावांमध्ये कचरा गोळा होतो आहे. हा कचरा पाठवताना ओल्या- सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण न करता कचराभूमीवर फेकला जातो दिवसभरात सुमारे दहा टन कचरा इथे फेकला जातो.

काही महिन्यांतच या कचराभूमीवरील कचरा साठवण्याची क्षमता संपेल. परिणामी कचरा कुठे साठवायचा असा प्रश्न पंचायत समिती पुढे निर्माण होईल तसेच परिसरात सर्वत्र हवा व जमिनीचे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Answered by ashokdwivedi1025
0

Answer:

Thanks mam

Explanation:

Nice Explanations very best wanderful

Similar questions