India Languages, asked by khotseema1978, 1 year ago

(३) दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा :
(१) दिलेले शब्द : वाघीण, पिले, बकरी, दूध, मैत्री, खेकडा, बगळा, चावा.

Answers

Answered by gpranit45
151

Answer:

बोध कथा (bodhakatha)

कथा....एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे ७ दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुत्तराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुत्तराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुत्तराने मनातल्या मनात ठरवले. एकदा कबुत्तर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबुत्तर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुत्तर उंदराच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...! "उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुत्तराचे संपूर्ण पंख कुर्तडलेले होते." फडफडत फडफडत कसाबसा कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले..., "तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले?" बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली... _*"उपकार कधीही वाघा सारख्या पुरुषी व्यक्तित्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*_ संकलित

Post a Comment

Newer PostOlder PostHome

Follow my Email

Email address...

Pranit Gaikwad

View my complete profile

xplanation:

It is useful to u

Answered by itsmeumair72
35

Answer:

this is your answer to the question

Attachments:
Similar questions