दोन आळ्याची नावे लिहा
Answers
मराठी लोकांच्या संपूर्ण नावाची रचना सामान्यत: व्यक्तिनाम, वडलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव अशी असते. असे असले तरी काही मराठीजन आपली नावे वेगळ्या पद्धतीने लिहितात.
पाळण्यातले नाव, व्यवहारातले नाव, व्यवसायासाठी घेतलेले नाव, टोपण नाव, सूचीमध्ये दाखल करण्यासाठीचे नाव असे नावाचे अनेक प्रकार आहेत.
महाराष्ट्रीय किंवा मराठीभाषक असणाऱ्या व्यक्तीच्या नावांचे प्रकार आणि नाव लिहिण्याच्या पद्धती
ह
मूल जन्माला येते तेव्हा त्याला किंवा तिला देण्यात येणारे तात्पुरते नाव म्हणजे जन्म नाव. ज्या प्रसूतिगृहात आईची प्रसूती होते होते तिथे हे नाव त्यांच्या नोंदणी वहीत नोंदण्यासाठीच्या उपयोगाचे असते.
अनेकदा हे नाव बालकाच्या जन्माच्या वेळी असलेल्या सूर्य, चंद्र, ग्रह, आणि नक्षत्रांच्या अंतराळातील स्थितीवर आधारलेल्या कुंडलीच्या अभ्यासातून मिळालेल्या आद्याक्षरापासून सुरू होणारे असते. मुलाच्या बारशाच्या वेळी हेच नाव मुक्रर करण्याचीही पद्धत अनेक समाजांत असते. त्यामुळे सारख्याच अक्षराने सुरू होणार्या नावाच्या व्यक्तींची रास एकच असते, असे महाराष्ट्रात आणि विशेषत: महाराष्ट्राबाहेर आढळून येते.
पाळण्यातले नाव संपादन करा
हिंदू समाजात बालकाच्या जन्मानंतरच्या बाराव्या दिवशी मुलाचे नामकरण किंवा बारसे करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी शक्य नसले तर हे बारसे नंतरही केले जाते. त्यादिवशी ठेवल्या जाणार्या नावाला ‘पाळण्यातले नाव’ असे म्हणतात. कधीकधी एकाऐवजी ‘हे’ ऊर्फ ‘ते’ असे जोडनावही ठेवले जाते. कारवार-मंगलोरकडे अशा वेळी पाच नावे ठेवण्याची पद्धत आहे.
ख्रिश्चनधर्मीय बालकांचे पाळण्यातले नाव कधीकधी दुहेरे किंवा तिहेरी जोडनाव असते. उदा० थॉमस अल्व्हा (एडिसन), रॉबर्ट लुई बॅलफोअर (स्टीव्हन्सन), जॉर्ज बर्नार्ड (शॉ), फर्दिनांद व्हिक्टर यूजीन (डेलाक्रॉइक्स) वगैरे. यांतले कंसात दिले आहे ते आडनाव आणि बाकीच्या त्या व्यक्तीचीच नावे. या नावप्रकारात क्रमाने दुसरे येणारे नाव हे ’मधले नाव’ समजले जाते. दक्षिणी भारतातही अशी पद्धत आहे. उदा० दासिग वेंकट सच्च सांब शिवर राव. यांतले हे दासिग हे गावाचे नाव किंवा आडनाव, राव हे तेलुगू किंवा कानडी असल्याचे दाखविण्यासाठी लावायचे उपपद आणि बाकीचे शब्द त्या व्यक्तीच्या नावाचे तुकडे. लिहिताना हे नाव D.V.S,अ.S.S. Rao असे लिहिले जाते.
उत्तरी भारतीयांत पाळण्यातल्या नावाचे दोन किंवा तीन तुकडे करून पूर्ण नाव बनते. उदा० हरि वंश राय बच्चन. यांतले बच्चन हे काव्यरचनेसाठी घेतले टोपणनाव आणि हरिवंशराय हे पाळण्यातले नाव. त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव वापरलेच नाही. त्यांच्या मुलानेही तेच केले. त्याने अमिताभ बच्चन असे नाव धारण केले. त्यामुळे मूळची ऐश्वर्या राय असलेली सून, ऐश्वर्या राय बच्चन झाली. लाल बहादुर शास्त्री श्रीवास्तव. यांच्या नावातली शास्त्री ही पदवी, श्रीवास्तव हे आडनाव आणि लाल बहादुर हे व्यक्तिनाव. लालबहादुर शास्त्री यांची मुले आता ’शास्त्री’ हेच आडनाव लावतात. जगदीशचंद्र बोस हे नाव J.C. Bose असे, तर श्रीधरलाल हे नाव S,D. Lal असे लिहितात.
अनेक भारतीय आपल्या जातीचे नाव आडनाव म्हणून वापरतात. सोनार, कुंभार, भट, भट्ट, अय्यर, नायर, आगरवाल (अग्रवाल), वगैरे. पंजाबी शीख आणि अनेक दक्षिणी भारतीय आपल्या खेड्याचे नाव आडनाव म्हणून वापरतात. उदा० लढ्ढा. महाराष्ट्रात गावाच्या नावानंतर कर किंवा वार लावून आडनाव बनते. उदा० मुळगावकर, हमपल्लीवार वगैरे. पारशी किंवा बोहरी लोकांनी गावाच्या नावानंतर ’वाला’ लावून आपले आडनाव बनवले आहे. नडियादवाला, कोलंबोवाला ही त्याची उदाहरणे. राजस्थानात ’इया’ प्रत्यय लावून आडनावे बनतात. कटारा गावचा माणूस आपले आडनाव कटारिया सांगतो