दैनदिक व्यवहार उपयोग येणारे आम्लधर्मी व पदार्थाचे प्रत्येकी एक नाव लिहा 10वी
Answers
Explanation:
जे आम्लारी (अल्कली) पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात, त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. आंबट चव आणि calcium सारख्या धातूंबरोबर व sodium carbonate सारख्या आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे हे आम्ल पदार्थांचे मुख्य गुणधर्म आहेत. पाण्याचे पी.एच. मूल्य ७ असते. आम्ल पदार्थांचे पी.एच मूल्य ७ पेक्षा कमी असते. पी.एच. मूल्य जितके कमी तितके त्याचे गुणधर्म तीव्र होतात .उदाहरणार्थ, सल्फ्युरिक, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक आणि फॉस्फोरिक आम्ल, कार्बोक्झिलिक आम्ल, सल्फाॅनिक आम्ल इत्यादी.
Acetic acid (vinegar मध्ये वापरतात), Sulphuric acid (मोटारगाड्यांच्या battery मध्ये वापर) व tartaric acid (Baking मध्ये वापर) ही व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या आम्लांची उदाहरणे आहेत. या उदाहरणांवरून दिसून येते की आम्ल हे मिश्रण असू शकते आणि घन किंवा द्रव पदार्थपण असू शकतो.
Hydrochloric acid हे वायुरूपात असून, पाण्यात विरघळल्यावर आम्लाचे गुणधर्म दर्शवते. तीव्र आम्ल पदार्थ हे धातूंवर गंज चढवतात; पण याला carbonic acid आणि boric acid असे अपवाद आहेत.
आम्ल पदार्थांच्या तीन व्याख्या आहेत: Arrhenius व्याख्या, Bronsted-Lowry वाख्या आणि Lewis व्याख्या. Arrhenius व्याख्येनुसार जे पदार्थ जल मिश्रणात hydronium (H+) विद्युतभारित कणांचे प्रमाण वाढवतात त्यांना आम्ल म्हणतात. Bronsted-Lowry च्या व्याख्येनुसार प्रोटॉन देणारे पदार्थ हे आम्ल पदार्थ असतात. व्यवहारात आढळणारी आम्ले ही जल मिश्रित किंवा पाण्यात विरघळणारी असतात. म्हणून या दोन्ही व्याख्या एकमेकांना पूरक आहेत. आम्ल पदार्थात hydronium (H+) विद्युतभारित कण ७ मोल्स/लिटरपेक्षा कमी असतात. आम्लाच्या कॉन्सन्ट्रेशनची संख्या ऋण असते. म्हणून आम्ल पदार्थांचे पी.एच. मूल्य ७ पेक्षा कमी असते.
रसायन शास्त्रात Lewis व्याख्या प्रचलित आहेत. यानुसार Lewis आम्ल म्हणजे जी विद्युत-परमाणू स्वीकारतात ती.. ह्याचे उदाहरण म्हणजे धातूंचे कॅटायन, boron trifluoride व aluminium trichloride सारख्या विद्युत-परमाणूंची कमतरता असणारे रेणू. तीनही व्याख्यांनुसार hydronium विद्युतभारित कण हे आम्ल पदार्थ आहेत. पण Bronsted-Lowry आम्ल असणारी अल्कोहोल व अमीन ही Lewis आम्लारी आहेत. कारण या रेणूंमध्ये oxygen व nitrogen या अणूंवर जी लोन पेअर (दोन्हीं अणूंमध्ये न विभागलेली विद्युतपरमाणूंची जोडी) असते, ती देऊन ते आम्लारी पदार्थांचे गुणधर्म दाखवतात.