दिपावली निबंध मराठी
Answers
Explanation:
भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.
आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.
दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.
दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.
असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.
श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.
दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.
त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी “दिपोत्सव” म्हणून ओळखली जाते.या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.
पारंपारिक रिती पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात.
दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाiई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.
दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सन’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्क्रूत् मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो.
भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.
.
.
.
.
hope it helps u.
be happy.