India Languages, asked by tejukolekar01, 4 hours ago

दुर्बल माणूस आणि जबरदस्त नियती संबंध​

Answers

Answered by loknadamjinaga1044
4

Answer:

मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण नतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.

उपयोजित नीतिशास्त्र ज्या अनेक नतिक समस्यांच्या प्रांतांची चिकित्सा करते आणि उपाय सुचवू पाहते त्या सर्व प्रांतांतील अतिप्राचीन प्रांत म्हणजे मानवी कामसंबंधाची रचना. विवाह व कुटुंबसंस्थेमुळे मानवी कामसंबंधाचे स्वरूप जितके सरळ दिसते, तितके वास्तवात सरळ नाही. नतिकतेचा प्रश्न जिथे अतिशय उग्र, वादग्रस्त, तापट आणि सर्वाधिक संवेदनशील बनतो ते हे क्षेत्र आहे. नतिक म्हणजे विवाहसंमत संबंध आणि अनतिक म्हणजे विवाहबाहय़ संबंध (विबासं) असा ढोबळ, पण कडक निकष असणारा हा लोकमान्य लोकप्रिय प्रांत आहे. (‘विबासं’ या नावाची अरुण म्हात्रेची अंतर्मुख करणारी कविता आहे.) ‘इतर मानवी व्यवहारांत अनतिकता असते, त्याचाही गंभीर विचार केला पाहिजे’, असा विचारच माणसाला सुचू देत नाही, इतका या प्रांतातील नतिक निकषाचा विचार भयानक मजबूत, शक्तिशाली आणि मेंदू बंद करणारा असतो.

एखादी व्यक्ती कितीही लबाड, गुन्हेगारी वृत्तीची असली, पण विबासं कृती करीत नसेल, तर ती नतिक व्यक्ती आणि एखादी व्यक्ती सचोटीची, प्रामाणिक, कर्तव्यकठोर असली, पण विबासं कृती करीत असेल, तर ती अनतिक, ढोंगी मानली जाते. शिक्षण, उच्च प्रशिक्षण, समजूतदारपणा, अभिवृत्ती, शहाणपणा, प्रज्ञान इत्यादी काहीही नसलेल्या सामान्य माणसालाही ही बांधेसूद अनतिकता समजते.

दोन व्यक्तींमधील कामसंबंध एका सूत्रबद्ध व्यवस्थेत बांधून टाकण्यासाठी लग्न आणि कुटुंबसंस्थेची रचना झाली. त्याच वेळी विबासंकृत अनतिकतेचा उगम झाला; पण मुळात कुटुंबसंस्थेतून सर्व संस्कृतींतील वर्ण, जात-जमाती आणि िलगभेदाच्या शोषणाचा पाया रचला गेला. Family आणि ‘कुटुंब’ या संस्कृत-मराठी शब्दाचा मूळ अर्थ घरगुती गुलाम, वेठबिगार. (कुटुंबव्यवस्थेत थोडेफार काही चांगले असते, तर सुटुंबव्यवस्था म्हटले असते! )

ब्रह्मचर्य, हस्तमथुन, विवाह, प्रजनन, गर्भनिरोधन, कपटप्रणयचेष्टा (flirting), लैंगिक स्वैराचार, जारकर्म, तात्पुरते कामसंबंध, लैंगिक छळ, पाशवी वर्तन, विनंती संभोग, भावनिक ब्लॅकमेिलग, विनयभंग, बलात्कार तसेच वेश्यागमन, समिलगी संबंध, जबरी संबंध, लिव्ह इन रिलेशन, अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट- निकटच्या निषिद्ध नात्यांमधील विवाह किंवा इतर लैंगिक संबंध), लैंगिक अपमार्गण (पॅराफिलिआ), अश्लील साहित्यांचा उपभोग आणि विविध लैंगिक विकृती व आजार या व अशा इतर अनेक संकल्पनांचा अचूक शोध घेणे, त्यांचे नेमके अर्थ निश्चित करणारी उपयोजित तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे लैंगिकतेचे तत्त्वज्ञान (the philosophy of sexuality) ही नवी विद्याशाखा. संकल्पनांचे अर्थ निश्चित झाले की, त्यांचा अभ्यासाचा, चिंतनाचा आणि मानवी आरोग्य व जीवन सुधारण्याचा मार्ग खुला होतो. हे महत्त्वाचे कार्य लैंगिकतेचे तत्त्वज्ञान करते.

लैंगिकतेच्या तत्त्वज्ञानाची दोन गृहीत तत्त्वे आहेत. एक- कामानंद व कामसमाधान मिळवून देणाऱ्या मानवी कृती आणि इच्छा शोधणे. दोन- या मानवी कृती आणि इच्छा केवळ कामानंद व कामसमाधान देणाऱ्या नसून नवी माणसे जगात आणणे, म्हणजे मानवजात टिकविणे याच्याशी निगडित आहेत, हे लक्षात आणून देणे. लैंगिकतेचे तत्त्वज्ञान वरील संकल्पनांचा व आनुषंगिक मुद्दय़ांचा सांकल्पनिक आणि आदर्शवादी असा दोन प्रकारचा शोध घेते.

सांकल्पनिक शोध म्हणजे कामेच्छा आणि कामकृती या मूलभूत कल्पना स्पष्ट करणे; त्यांच्या व्याख्या, मर्यादा, त्यातील भावी संशोधन यांचे विश्लेषण करणे. जसे की, एखादी इच्छा कामेच्छेत रूपांतरित होते म्हणजे नेमके काय घडते किंवा फसवून कामोपभोग घेणे आणि अिहसक बलात्कार या संकल्पना व त्याप्रमाणे होणारी कृती यात नेमका फरक काय आहे? यांचे विश्लेषण करणे. (उदाहरणार्थ बटरड्र रसेलचे लग्नाबद्दलचे मत.)

आदर्शवादी शोध म्हणजे कामेच्छा, कामकृती व कामसमाधान यांच्या नतिक मूल्यमापनाची कसोटी रचणे. या कसोटय़ा शोधणे, रचणे, त्यांच्या समर्थनाचे युक्तिवाद रचणे हे मोठय़ा जिकिरीचे, अवघड आणि नाजूक काम असते. थोडक्यात, लैंगिकतेचे तत्त्वज्ञान दोन हेतू सांगते. पहिला- मानवी जीवन गुणवान, शुभ पातळीला नेण्यात मानवी लैंगिकता कोणते योगदान देते आणि कामकृती करताना कोणती नतिक बंधने पाळणे आवश्यक व अनिवार्य आहे, याची मांडणी करणे.

Answered by satyamdevkar2004
8

Answer:

दुर्बल माणूस आणि जबरदस्त नियती संबंध

Similar questions