English, asked by punamsm1984, 5 months ago

थोर शास्त्रज्ञाचे नाव​

Answers

Answered by Anonymous
14

पुणे - व्यवसायाने शिक्षक असलेले जॉर्ज सायमन ओहम हे जर्मन देशाचे थोर पदार्थ वैज्ञानिक आणि गणित तज्ञ होते. अध्यापानासोबत त्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करण्याची आवड होती. इटलीच्या अलेस्सान्द्रो व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या कार्याचा प्रभाव ओहोम यांच्यावर होता. विद्युतरासायनिक घट (इलेक्‍ट्रोकेमिकल सेल) ची क्षमता आणि धातू, अधातू यांची विद्युत वाहकता संदर्भातील ओहोमचे प्रयोग आजही प्रसिद्ध आहेत. विद्युत-वहन संदर्भात ओहोमनी त्यांच्या प्रयोगाद्वारे 'विद्युत धारा आणि विभवांतर या एकमेकीशी समप्रमाणात असतात' हा नियम प्रस्थापित केला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ विद्युत-प्रतिकार-शक्ती (इलेक्‍ट्रिक रेझीसटन्स) मापन एककासाठी 'ओहोम' असे नाव दिले आहे.

Similar questions