दूरदर्शन मित्र की शत्रु निबंध मराठी
Answers
Answer:
hope it helps
Mark as brainliest
Answer:
Explanation:
'दूरदर्शन नि आम्हाला काय दिले ?' खरोखरच या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आली का आली आहे. कारण भारतात दूरदर्शन येऊन आता पंचवीस वर्षे होऊन गेली. २ ऑक्टोंबर १९७२ रोजी मुंबई टीव्ही सुरू झाला. त्यापूर्वी दिल्ली टीव्ही होता पण तो इतक्या लोकांपर्यंत पोहोचला नव्हता. त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांनी दूरदर्शनचा प्रकार खेडोपाडी व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. ' लोकांना भाकरी हवी आहे, टीव्ही नको' अशी परखड टीकाही झाली. या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की ," भाकरीही देऊ; पण विचारांची भूक भागवण्यासाठी दूरचित्रवाणी हवीत."
आताही दूरचित्रवाणी दूरवर पोचली आहे. आता शहराप्रमाणे गावागावातून बंगल्यातून, उंच इमारतीतून त्याचप्रमाणे सर्वत्र झोपडपट्टीतून, गोरगरिबांच्या व त्यातूनही दूरदर्शन ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. आपण दूरदर्शन वरच्या विविध वाहिन्या पाहतो, तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो. केवळ मराठी भाषेत कार्यक्रम सादर करणाऱ्या सहा वाहिन्या आहेत. या वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या विविध कार्यक्रमामुळे आज अनेक कलावंत, तंत्रज्ञ यांनी आपल्या कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी खरे कार्यक्षेत्र मिळाले आहे. हे कलावंत पुढे येत आहेत जुन्या चांगल्या साहित्याची ओळख अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. ही दूरदर्शन ने दिलेली भेट नाही का ?
मनोरंजन आणि प्रबोधन हे दूरदर्शन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. हात दूरदर्शनचा मनोरंजनाचा गुण आता टीकेला कारण होत आहे. दूरदर्शन त्यांच्यापुढे माणसे मुले चिटकुन बसतात. त्यामुळे वाचनाची सवय राहत नाही. मुले मोकळ्या हवेत खेळत नाही, हा आरोप दूरदर्शनवर केला जातो. मंडळी दूरदर्शनला ' इडियट बॉक्स' म्हणतात. त्यांच्या मते दूरदर्शन पाहणारी माणसे विचार करत नाहीत. काही अंशी हे आरोप खरेही असतील. पण त्याच बरोबर या विचारवंतांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, पुस्तके वाचून त्यावर चिंतन करणारा समाज आपल्याकडे किती आहे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांनी आपले वाचन आज सोडले नाही.
उरलेला जो न वाचणारा किंवा ज्याला वाचता येत नाही, आता केवढा तरी मोठा समाजाचा भाग आहे. त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे काम ' दूरचित्रवाणी नक्कीच करते. दूरचित्रवाणी मुळे आपल्या तळागाळातला समाज बर्याच नवीन गोष्टी आहे. एशियाड, ऑलिंपिक अशा स्पर्धा आज वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत पण दूरचित्रवाणी मुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. क्रिकेट फुटबॉल बरोबर कबड्डी, खो-खो चे सामनेही बारकाईने पाहणे जातात. प्राणी जगता विषय भोगोलिक माहिती देणारी वाहिनी ( नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी इत्यादी) अतिशय अपूर्व माहिती प्रेक्षकांना देते. बातम्या दृक त्यामुळे ती ती स्थळे समोर येतात. सारे जग जवळ येते. शेतकरी, कामगार यांचे प्रश्न दूरचित्रवाणीवर मांडले जातात. आपल्या घरात एकांकी जीवन जगणाऱ्या वृद्धांना दूरचित्रवाणी हे वरदानच ठरले आहे. दूरदर्शन भरभरून देत आहे. यातून आपण किती व काय घ्यायचे, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.
तर विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध | Doordarshan shap ki vardan marathi nibandh हा निबंध आपण बघितला पण आज घडीला जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती नसेल २५ -३० वर्षापूर्वी आठ दूरचित्रवाणी संच म्हणजे टीव्ही घरात असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे आणि मनोरंजन आणि करून नक्की करता ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आजूबाजूच्या घरातील मंडळी सिनेमागृह प्रमाणे टीव्ही त्यांच्यासमोर दुसऱ्यांच्या घरी जाऊन बघायचे म्हणजे त्याकाळी दूरचित्रवाणीवर प्रसारित होणारे कार्यक्रम संपूर्ण कुटुंबिक वातावरण यात पाहण्याजोगे होते पण आज रोजी जर विचार केला तर चैनल चे पर्याय खूप उपलब्ध आहेत पण मनोरंजनाचा दर्जा मात्र घसरला आहे. ज्ञान आजही मिळते आहे पण असेच ज्ञान आणि विज्ञानाची माहिती देणारे, संस्कारक्षम वाहिन्या कमी झाले आहेत. आज तुम्ही विद्यार्थीदशेत आहात विद्यार्जन करणे हे आपले प्रथम कर्तव्य त्यामुळे प्रेरणात्मक, ज्ञानात्मक, नैतिकता शिकवणारे, विज्ञानिक दृष्टीकोन, इतिहास, संस्कृती याच्याशी संदर्भात माहिती देणारे चैनल तुम्हाला शैक्षणिक दृष्ट्या तसेच व्यक्तिमत्व विकास या दृष्टिकोनातून खूपच फायदेशीर ठरतील तसेच तुम्हाला माहिती असेलच जे आर डी टाटा, सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम, अमर्त्य सेन यांनी आपल्या विद्यार्थीदशेत चांगल्या संस्कारक्षम गोष्टी आत्मसात केल्या होत्या वाचन लेखन केले होते त्यामुळे आज त्यांचे उदाहरणे प्रत्येक दिले जातात तर ते शेवटी काय तर दूरदर्शन वरदान नक्कीच आहे. जर तुमचा बघण्याचा दृष्टीकोण जर योग्य असेल तर अन्यथा दूरदर्शन शाप ठरेल असे खेदाने म्हणावे लागेल