दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत.
Answers
आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन. ३१ वाहिन्या, ६६ अद्ययावत स्टुडिओ, १४१३ ट्र्रान्समीटर्स आणि १२ कोटीहून अधिक घरांमधे पोचण्याची क्षमता असलेले दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठ्या दूरचित्रवाणी नेटवर्कपैकी एक आहे.
सध्या केबल वाहिन्यांच्या जंजाळामधे आणि एकंदरीतच माहितीच्या विस्फ़ोटामधे माध्यमे क्षणाक्षणाला बदलत आहेत. करमणुकीचे मनोरंजनाच्या संज्ञा बदलत आहेत. एफ़एमच्या लोकप्रियतेने रेडीओ पुन्हा एकदा कानात वाजू लागलाय, पण एके काळी या ऑल इंडिया रेडिओचेच बाळ असलेले आणि नंतर पूर्ण माध्यमसत्ता एकहाती गाजवणारे दूरदर्शन हे जरा दुर्ल़क्षित झालेले आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळामधे दूरदर्शन, त्याची संकल्पना आनि विकास याचबरोबर विकासात्मक संवाद (डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन) यामधे असलेले योगदान अढळ आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५६ मधे दूरचित्रवाणीचा शैक्षणिक, ग्राम विकास आणि सामाजिक प्रगतीचे माध्यम म्हणून उपयोग करण्यासाठी २० हजार डॉलर निधीची तरतूद करण्यात आली. १९५९मधे दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू झाले, यादरम्यान त्याचे अस्तित्व आकाशवाणीचा एक विभाग यापलिकडे नव्हते. मात्र या माध्यमाचे महत्त्व आणि सामर्थ्य यांचा अंदाज तेव्हा पुरेसा आला होता कारण तेव्हा याकडे मनोरंजनाचे माध्यम म्हणून न पाहता समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणूनच पाहिले जात होते. या चाचणी प्रक्षेपणामधे गणित विज्ञान इत्यादि कार्यक्रमांना विद्यार्थीवर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाले होते.
एप्रिल १९६५ पासून सुरूवातीला आठवड्याला चार दिवस आणि दिवसातून एकच तास अशा दूरदर्शनच्या सर्वसाधारण प्रक्षेपण सेवेचा आरंभ केला. दिल्ली आणि आसपासच्या खेड्य़ांमधे बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातून दोन दिवस २० मिनीटांचे शेतकी विषयक कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात येई. हे कार्यक्रम बघता यावेत म्हणून प्रतेक खेड्य़ात टीव्ही संच सार्वजनिक स्थानी ठेवले होते. हे कार्यक्रम अणुउर्जा विभागाने माहिती प्रसारण मंत्रालय, आकाशवाणी, भारतीय कृषी अनुसंधान संस्स्थान आणि दिल्ली प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवले. १५ ऑगस्ट १९६५ पासून दररोज प्रक्षेपणाला सुरूवात केली. १९७२ मधे मुंबई, जानेवरी १९७३ मधे श्रीनगर, आणि त्यानंतर कलकत्ता, मद्रास, लखनौ, अमृतसर आणि जालंधर ही केंद्रे चालू झाली. हे प्रक्षेपण भूस्तरीय होते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी उपग्रहीय संचार प्रणाली वापरणे आवश्यक होते.
साईट (सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलीव्हेजन एक्स्परिमेंट) हा विक्रम साराभाईंच्या पुढाकाराने अमेरिकेच्या नासा आणि भारत सरकार यांच्यात एका करारान्वये नासाच्या उपग्रह संचार प्रणाली वापराचा एक प्रयोग करण्यात आला. यामधे नासाची उपग्रह संचार प्रणाली दररोज काही ठराविक तासांकरिता भारतीय उपखंडातील दूरचित्रवाणी प्रसारणाकरिता वापरण्यात येणार होती. या प्रयोगामधून असे लक्षात आले की, विकासात्मक संवादासाठी दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. या प्रयोगानंतर ट्रान्समीटर्सच्या मदतीने भूस्तरीय कार्यक्रम पक्षेपित करण्यात येऊ लागले. बहुचर्चित खेडा कम्युनिकेशन प्रोजेक्ट यानंतरच चालू करण्यात आला. १ एप्रिल १९७६ पासून दूरदर्शनला स्वतंत्र अस्तित्व मिळाले आणि पुढील दोन दशकांमधे अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम प्रसारित करून भारताच्या माध्यमक्रांतीमधे एक मोलाची भर घातली गेली.
१५ सप्टेंबर१९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी " दिल्ली दूरदर्शन केंद्रा" चे उद्घाटन केले. आणि महाराष्ट्रात १ मे १९७२ रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. १५ ऑगस्ट१९८२ या दिवशी रंगीत दूरदर्शन चे आगमन झाले.
सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठरावीक वेळ मनोरंजन असे दूरदर्शन चे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम ,वार्तापत्रे, राष्ट्रपती-प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याचे सविस्तर वार्तांकन , बातम्या असे एक-एक उपक्रम वाढत गेले. रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळात बहुसंख्य लोक दूरदर्शन समोरच बसून असायचे या माध्यमाच्या लोकप्रियतेची चुणूक या मालिकांनी दाखवून दिली.
१९९१ च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन सि.एल.एन. या वाहिनी ने जगभर दाखविले.
या टप्प्यावर भारतातील वृत्त वाहिन्याचे विश्वच बदलून गेले.
१९९८ मध्ये ' स्टार' या खाजगी उद्योगसूद भारतात आला यामुळे भारतातील सुरूवातीच्या काळातील नीरस,एकसुरी प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले.
भाषा सादरीकरणाचे तंत्र , तंत्रसज्ज स्टुडिओ आणि ओबी व्हँन्सचा वापर यामुळे या वाहिन्यांंनी विस्तार घडवून आणला यामुळे वार्तांकनात खुलेपणा, बहुविधता आली. देशाचा कानाकोपरा जोडला गेला. याचा परिणाम राजकारणावर सुद्धा झाला...... सारा देश बदलू लागला.
अशा प्रकारे दूरदर्शन या माध्यमामध्ये बदल घडून आला.