History, asked by giteshrajkuwar7517, 5 hours ago

दुसरे ब्राहामी युध्य... यांच्या काळात लढले गेले​

Answers

Answered by harshalkharje
0

Answer:

१८२४ ते १८८६ या कालावधीत ब्रह्मी राजे व इंग्रज यांमध्ये तीन युद्धे झाली. या युद्धांना इंग्रज ब्रह्मी युद्धे असेही म्हटले जाते. या युद्धांत टप्प्याटप्प्याने ब्रह्मी सार्वभौमत्वाचा संकोच होत जाऊन १८८६ साली या देशाचे स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट झाले आणि ब्रिटिश साम्राज्याची सीमा मलाया, सयाम आणि चीन या देशांच्या सीमांना भिडली. एडन (दक्षिण येमेन), त्रिंकोमाली [→श्रीलंका], ⇨सिंगापूर यांमधील सागरी प्रदेशावर ब्रिटिश सागरी सत्ता निर्वैरपणे प्रस्थापित झाली.

दुसरे युद्ध (१२ एप्रिल १८५२-१८ फेब्रुवारी १८५३) : हिंदुस्थानचा साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स डलहौसी व ब्रह्मी राजा पगानमिन (कार. १८४६-५३) यांचा या युद्धाशी संबंध होता. पहिल्या युद्धानंतरच्या काळात चिंद्विन नदी व मणिपूर यांमधील प्रदेशाबाबत नवे वाद निर्माण झाले होते. चीन, सयाम व खुद्द ब्रह्मदेश यांच्याबरोबरचा व्यापार वाढविण्यासाठी खास सवलती व सुविधा मिळविण्याच्या प्रयत्नात ब्रिटिश होते. १८४६-१८५२ या काळातील पगानमिनची राजवट अस्थिर होती. १८५० पर्यंत हिंदुस्थानातील इंग्रज-शीख युद्धे व इतर राजकीय उलाढाली यांमुळे लॉर्ड जेम्स डलहौसी याला ब्रह्मदेशावर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले नाही. १८५० ते १८५१ मध्ये ब्रह्मी राजा यांदाबो तहाच्या अटी तंतोतंत पाळीत नाहीब्रिटिश व हिंदुस्थानी व्यापाराला नाहक अडथळा करीत आहे व रंगून येथे जहाज बांधण्याच्या कामात अडचणी निर्माण करण्यात येत आहेत इ. सबबी पुढे करून युद्धाची पार्श्वभूमी तयार करण्यास ब्रिटिशांनी आरंभ केला.

१८५१ च्या मध्यास दोन ब्रिटिश नाविक अधिकाऱ्याना खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून ब्रह्मी सरकारने दंड केला. याउलट डलहौसीने ब्रह्मी सरकारकडेच नुकसानभरपाई मागितली आणि ती न दिल्यास युद्धाची धमकी दिली. याबरोबरच डलहौसीने युद्धाच्या दृष्टीने आरमार व सैन्य सुसज्ज करण्यास सुरुवात केली. १८५१ च्या शेवटी डलहौसीने कमोडर लँबर्ट या नाविक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली दोन युद्धनौका रंगूनला पाठवून शक्तिप्रदर्शन केले. ब्रह्मी सरकारने ब्रिटिशांच्या तक्रारी दूर करण्याचे आश्वासन दिलेतथापि ब्रिटिश आरमार पाहून रंगूनच्या ब्रह्मी अधिकाऱ्याने काही सैन्य तयार ठेविले. लँबर्टने रंगूनची नाकेबंदी करून ब्रह्मी नौकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. ब्रह्मी लोकांनी थोडा गोळामार करताच लँबर्टने सर्व ब्रह्मी नौका बुडविल्या व तो कलकत्त्यास परतला. पुढे डलहौसीने ब्रिटिश आरमार व सैन्य रंगूनला आणले व पूर्वीची नुकसानभरपाईची मागणी दहा लक्ष रुपयांपर्यंत वाढवून ती मार्च अखेर चुकती करण्यास ब्रह्मी राजाला बजावले आणि त्याप्रमाणे ब्रह्मी राजाच्या उत्तराची वाट न पाहता १२ एप्रिल १८५२ रोजी हल्ले सुरू केले. ब्रह्मी प्रतिकार कडवा नव्हता. त्यामुळे डिसेंबर १८५२ पर्यंत बासेन, मार्तांबान, रंगून व पेगू हे प्रांत ब्रिटिशांनी जिंकले. याच सुमारास पगानमिनविरुद्ध त्याच्या सावत्र भावाने (मिंडोंमिन) बंड करून ब्रह्मदेशाची गादी बळकाविली. परिणामतः १८ फेब्रुवारी १८५३ च्या सुमारास दुसरे इंग्रज-ब्रह्मी युद्ध समाप्त झाले. या युद्धाकरिता हिंदुस्थानी तिजोरीतून एक कोटी रुपये खर्च झाले. बंगाल प्रांत ते तेनासरीम या प्रदेशांवर ब्रिटिश अंमल प्रस्थापित झाला. उत्तरेकडील ब्रह्मदेश कोंडीत पकडला गेला. डलहौसीने या युद्धाची जय्यत तयारी केल्यामुळे इंग्रजांची सैन्यहानी किरकोळ झालीमात्र ब्रह्मी सैन्यहानी बरीच मोठी असावी. या युद्धसमाप्तीनंतर तहाच्या वाटाघाटी झाल्या (मार्च-मे १८५३)तथापि ब्रिटिशांनी नवीन मुद्दे उपस्थित केल्याने तह झालाच नाही.

Similar questions