देशासाठी माझे योगदान निबंध (25 line)
Answers
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आपण लहानपणी किंवा मोठेपणी सगळ्यांनी नक्कीच घेतली असेल आणि त्या प्रतिज्ञेनुसार आपल्याला देशसेवा करणे बंधनकारक आहे परंतु सगळ्यांच्या मनात देश सेवा म्हटली की डोळ्यासमोर येते ती आर्मी माझ्या मतानुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या कधींना कधी देशसेवेसाठी देशाच्या लष्करात जाण्याच्या विचार नक्कीच आला असेल . मात्र सगळ्यांनाच लष्करात जाणे शक्य नाही.
माझे देखील देशाच्या लष्करात जाण्याचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. परंतु आता माझे वय कमी असल्यामुळे मला ते शक्य नाही . तरी देखील मी देशसेवा माझ्या परीने करत आहे . माझ्या देशसेवेत सगळ्या गोष्टीत नियम पाळणे, कोणताही गुन्हा माझ्या हातून घडणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी मी पुरेपूररित्या घेतो त्याचप्रमाणे गरजूंना मदत करणे , आणि आपल्या भारतमातेच्या भूमीवर जर कुणी वाईट करत असेल तर त्याला समजावणे ह्या गोष्टी जरी तुमच्या- आमच्या दृष्टीने लहान असल्या तरी त्यातून देशसेवा केल्याचे समाधान मला मिळते. आणि हे तुम्ही जर केलेत तर तुम्हाला देखील देशसेवेचे समाधान मिळेल.
हल्लीच्या डिजिटल जगात अफवा नावाची गोष्ट देशाच्या विकासाला बाधा ठरत आहे. म्हणून मी देशसेवा करण्यासाठी माझ्या मनाशी एक शपथ घेतली आहे की या पुढे सोशल मीडियावरील कोणताही लेखाची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय मी पुढे ती पाठवणार नाही .आणि मला माहीत आहे जर अशीच सेवा माझ्याप्रमाणे आपण सगळ्यांनी घेतलीत तर आपला देशाला जगातील महासत्ता बनण्यास कोणतीही ताकद रोखू शकणार नाही.
आपण नेहमी विचारत असतो की या देशाने मला काई दिलंय. या देशाने आपल्याला राहायला घर, खायला अन्न, एक ओळख आणि सर्वात मोठं भारतीयत्व दिलंय. पण आता वेळ आली आहे आपण स्वतःला विचारायची की आपण देशासाठी काय केले पाहिजे.
उदाहरणार्थ, मी शरीर कमजोर असल्यामुळे भारतीय सेनेत जाऊ शकत नाही. तरी मी देशासाठी खूप काही करू शकतो. मी स्वतःच्या उत्पन्नाचा काही वाटा इतरांसाठी दान करेल. आठवड्यातुन एक दिवस समाजसेवेसाठी देईल.
मी भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवेल. भारतीय कपडे व इतर वस्तुंना प्राधान्य देईल. शिक्षण पूर्ण करून बाहेर कमवायला जाण्यापेक्षा इथेच राहून मातृभूमीची सेवा करेल. अशा प्रकारे मी माझ्या परीने देशासाठी पूर्णतः योगदान देईल.
धन्यवाद...