India Languages, asked by samirjoshi2005, 1 month ago

देशभक्ती बद्दलचा माझा दृष्टिकोन निबंध​

Answers

Answered by lovalakshmidevi
1

Answer:

भारताला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाची ओळख कधीच नव्हती. देवाच्या आणि मानवतेच्या पूजेपेक्षाही देशाची भक्ती श्रेष्ठ आहे, असं मला अगदी लहानपणापासून शिकवलं गेलं आहे, पण आता मी त्या शिकवणीच्या पल्याड पोहोचलो आहे आणि माझे देशबांधवही मानवतेपेक्षा देश श्रेष्ठ मानण्याच्या शिकवणीशी संघर्ष करतील, तरच ते खऱ्या अर्थाने त्यांचा भारत मिळवू शकतील, अशी मला खात्री आहे.” - रवींद्रनाथ टागोर, 'भारतीय राष्ट्रवाद' या १९१७ साली लिहिलेल्या निबंधातून

हा निबंध लिहिल्यानंतर शंभर वर्षांत आपल्या देशाने आपले विचार गुंडाळून ठेवून आपल्याच लेखणीतून उतरलेल्या राष्ट्रगीताच्या निमित्ताने तथाकथित राष्ट्रवादात केवढी प्रगती केली आहे, हे पाहिल्यावर रवींद्रनाथ आज स्तिमित आणि विस्मयचकित झाले असते. गोपालकृष्ण गांधी यांनी या संदर्भात लिहिलेल्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे, 'महात्मा गांधीही आज हयात असते, तर सिनेमागृहात प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत वाजवण्याचा आणि ते सुरू असताना उभे राहून मानवंदना देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा सक्तीचा आदेश ऐकून म्हणाले असते, 'अच्छा, म्हणजे 'गॉड सेव्ह द किंग'च्या जागी गुरुदेवांची रचना आली फक्त! बाकी सगळं जसंच्या तसंच दिसतंय?'

Similar questions