Hindi, asked by poojashinde3004, 10 months ago


'देशसेवा हीच ईश्वरसेवा' असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते.

Answers

Answered by adishrishama
36

Answer:

देश हाच देव समजून सैनिक देशाची सेवा करीत असतात. अनेक महिने ते आपले घरदार, कुटंब सोडून सीमेवर लढत असतात. ऊन, थंडी, पावसाची न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. अशा वेळेस आम्ही त्यांच्या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करू शकतो. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो. मकर संक्रांतीला सीमेवरच्या जवा नान साठी तिळगुळ पाठवून अनेहप्रदर्शित करू शकतो. त्यांच्या गावातील व शहरातील कुटुंबाकडे भेट देऊन त्यांच्या कुटुंबाची खुशाली विचारू शकतो.     त्यांच्या मुलांना अभ्यासात इतर अडीअडचणीला मदत करून त्यांच्याशी व सैनिकाशी प्रेमाचे अतूट नाते जोडू शकतो.

Answered by sani0912
10

Answer:

'देश हाच देव' असे समजून देशाच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणारे सैनिक अतिशय निःस्वार्थ

भावनेने दिवसरात्र देशाच्या सीमेवर पहारा देत असतात. सामान्य जनता या सैनिकांचे महत्त्व तर जाणते मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची मदत करणे आपल्याला शक्य होत नाही. अशावेळी सण-उत्सवाच्या वेळी आपल्याकडून मिठाई, फराळ सैनिकांसाठी पाठवला गेला पाहिजे.

सैनिक आपल्यासाठी मरण पत्करतो ही जाणीव ठेवून आपण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला कोणत्या प्रकारे सहकार्य करता येईल ते पाहिले पाहिजे. यासाठी सोशल मिडीयाचा उत्तम प्रकारे वापर करता येईल. आपण आपल्या कृतीद्वारे सैनिकांबद्दलचा आदर व्यक्त केला पाहिजे. एका मतप्रवाहाप्रमाणे सैनिक शहीद झाल्यानंतर, देशवासीयांच्या बँकेतील खात्यातून प्रत्येकी रूपया आपोआप शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाला मदत म्हणून दिला गेला तर प्रत्येकाने काहीतरी मदत केल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते.

सैनिकांचे कार्य हे आपल्यासाठी कधीही न फिटणारे उपकारांचे ओझे आहे. त्याकरिता जमेल तेव्हा जमेल तसा खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे.

Please mark my answer as brainliest

If it's helpful for you

thank you

Similar questions