Art, asked by ashishshingole83, 2 months ago

देता किती घेशील दो कराने अशा निसर्गातील परिस्थितीचे वर्णन तुमच्या शब्दात करा​

Answers

Answered by shahzadalam5679
6

Answer:

श्रावण सोमवार, हिरव्यागार पाचुरंगी शालीमधे लपेटलेली धरित्री, कोवळ्या सुकुमार तनुला वार्‍याच्या झोताने त्रास होऊ नये म्हणून चेहर्‍यावर ओढलेली धुक्याची झिरझिरीत ओढणी, अंगा खांद्यावर खेळणारी, किलबिलणारी, छोटी पाखरे. पावसाळ्यात मन मोहून टाकणारे हे पृथ्वीचे रूप डोळ्यात साठवायला आम्ही आडी मलय्याला निघालो. डोंगराच्या पायथ्याशी दिसणार्‍या हिरव्या रंगाच्या अगणित छटा डोळ्यात मावत नव्हत्या. त्याचे पोतही काही न्यारे होते. त्या विविध छटांची गोधडी पिवळसर पायवाटेने जोडली होती. डोंगरावरून दिसणारा निसर्गाचा नजारा काही औरच होता. भक्तजन शुचिर्भूत होऊन दर्शनाला आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एक गोष्ट जाणवली.

तिथल्या चबुतर्‍यावर भरपूरसे तांदूळ देवासाठी भाविक ठेवत होते. मनात आले, हे तांदूळ देवापुढे ठेवून त्यात कुंकू, हळद, बुक्का, अंगारा, फुले मिसळण्यापेक्षा, ते वेगळेच एका पेटीत टाकून गरीबांना शिधा म्हणून दिला तर लोकांच्या मुखी लागतील. भुकेने व्याकुळलेला जीव तृप्तीने ढेकर देईल. या वाया जाणार्‍या अन्नाचा सदुपयोग व्हावा असे वाटले तेव्हाच असेही जाणवले की दैनंदिन जीवनात आपण कितीतरी नैसर्गिक आणि राष्ट्रीय साधनसंपत्तीचा विनियोग योग्य प्रकारे न करता आपण ती वाया घालवतो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपलाच फक्त व्यक्तित्व विकास करत असताना समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही सामाजिक बांधीलकीची भावना जपली पाहिजे. कारण स्वत:कडे लक्ष देताना आपण समाजाचा एक घटक असल्याने तिकडेही लक्ष देणे अपरिहार्य असते. त्यामुळे आपोआपच आपल्याही आयुष्याला शिस्त लागते.

पंगत असेल तर नक्कीच आपण आपल्याला आवश्यक तेवढे पानात घेऊ शकतो. पण पूर्वी जेवणाच्या पंक्तीत आग्रह व्हायचा आणि आपल्या मर्यादेपेक्षा जास्त जेवण पानात वाढले गेले की ते टाकून उठायला लगायचे. पण आजकाल बुफे जेवण पद्धतीतही लोकांना आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त पानात वाढून घ्यायची सवय पडली आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. एका बाजूला भुकेल्यांना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोटभरून जेवण होऊन ते वाया जात आहे. दोन्हीचा समन्वय साधायचा तर निदान आपण खाताना, जेवताना एवढी काळजी घेतली पाहिजे की आपण पानात जे टाकतोय ते कुणाच्या तरी मुखी लागले असते, म्हणू घेतानाच कमी वाढून घ्यावे, आपल्याला जेवढे हवे तितकेच खावे. देवाला दुधाचा अभिषेक, शनीला, मारुतीला तेल घालून ते वाया घालवतात. त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारात उपयोग केला किंवा तेवढेच तेल गरीबांना दिलेत तर ! त्यांच्या खाण्याला हातभार लागेलच शिवाय देव देवतांना जे तेल घालून मेणचटपणाचा थर देवावर चढवतात त्याऐवजी देव स्वच्छ राहतील.

जेव्हा गेल्या वर्षी पाऊसच झाला नाही, तेव्हा शेतीसाठी तर पाण्याचे दुर्भिक्ष होतेच. एकीकडे प्यायच्या पाण्याचीहि भ्रांत होती. आणि दुसरीकडे आपली वाहने धुवायला, अंगणात सडा घालायला मुबलक पाणी वापरले जात होते. काही ठिकाणी पाइप फुटल्याने विनाकारण पाणी वाया जात होते. त्यावेळी जाणवले थेंब थेंब पाणी वाचवणे किती महत्वाचे आहे ते. जनावरे पाण्याविना मरत होती. लातूर, बीडसारख्या ठिकाणी लोकांना कित्येक मैल चालत जाऊन एखाद्या डबक्यातले पाणी पिण्यासाठी आणावे लागत होते. जीवनावश्यक गरजा पुरवाताना जेव्हा साधनांचा तुटवडा पडतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. ती मुबलक मिळत असतानाही जपून वापरली पाहिजेत. निदान वाया जाऊ देता नये. नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय म्हणजे पर्यायाने आपल्या भविष्यकाळासाठी त्या साधनांची कमतरता.

आता गणपतीच्या दिवसात एक तर इको फ्रेन्डली गणपती (कागदाचा) आणि त्याची सजावट करणे चांगले. आणि अगदीच जमले नाही तर आणि शाडूच्या मूर्तिची स्थापना केली असेल तर त्याचे विसर्जन नदीत किंवा तलावात करण्याऐवजी काहीलीत किंवा टब, बादलीत करून ती माती पुन्हा उपयोगाला येईल असे बघावे. देवाचे निर्माल्य झाडांसाठी वापरुन त्याचा सदुपयोग करावा. पर्यावरणाचे प्रदूषणही टाळता येईल. आणि नैसर्गिक साधनांचा पुरेपूर उपयोगही होईल.

सत्यशोधक चळवळीचे कोल्हापुरातील खंदे कार्यकर्ते आमदार कै. डी. एस. नार्वेकर यांनी काही तत्वे सांगितली होती. त्यापैकि एक, विवाह लागताना अक्षता पायदळी तुडवून तांदूळ वाया जाऊ नयेत फुलांच्या अक्षता वापराव्यात. दुसरे म्हणजे लग्नाकार्यात जो डामडौल, छान छोकीचा वाया खर्च फार न करता, जेवढा आवश्यक तेवढा करून विवाह रजिस्टर पद्धतीने करून खर्चाला फाटा दिला तर विनाकारण पैशाचा अपव्यय होणार नाही. विवाह विधीसुद्धा सुटसुटीत होतील. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. मग त्याचा विनियोग प्रत्येकाने जबाबदारीने करायला हवा. वृक्षतोड तर होतेच आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र आचरणात आणला पाहिजे. नैसर्गिक संपत्तीचा ह्रास थांबवायचा असेल तर प्रत्येकाने सुरुवात स्वत;पासूनच करायला हवी नाही का?

------------------सविता नाबर

Explanation:

please make me on brainylist

Answered by ridhimakh1219
0

परिस्थितीमुळे समरस होण्याची शक्यता आहे

स्पष्टीकरणः

  • आम्ही म्हणतो की “परिस्थितीचे स्वरूप” असेच आहे. कदाचित ही परिस्थिती अशी असेल की सुसंवाद निर्माण होऊ शकेल. तो त्याच्या स्वभावाचा भाग असेल. किंवा हिंसा होण्याची शक्यता असू शकते.
  • जेव्हा आपण खात्री पटवून देण्यासाठी बर्‍याच पद्धती वापरु शकता, परंतु कोणत्याही गोष्टीची हमी दिलेली नाही, बहुतेकदा जेव्हा आपण आणि प्रत्येक वेळी त्या प्रत्येकाला सामोरे जाता तेव्हा परिस्थिती बदलते. आपल्यास परिस्थिती सोपी वाटत असली तरी ती व्यक्तीच्या बाबतीतही कमी असेल.
  • केलरमॅन आणि कोल यांनी वर्णन केलेल्या अनुपालन-प्राप्त करण्याच्या 64 धोरणांपैकी 43 व्या स्थितीची स्थिती आहे.

Similar questions