Hindi, asked by gwalke57, 4 months ago

'दंतकथा' हा पाठ तुम्हाला आवडण्याचीवा न आवडण्याची कारणे लिहा.​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

hope it helps

Explanation:

Attachments:
Answered by sadiaanam
0

Answer:

या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.

Explanation:

पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी 'दंतकथा' हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस. वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे. प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी - वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.

एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे

इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो. भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. 'दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर' अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात.

For more such question: https://brainly.in/question/12254610

#SPJ2

Similar questions