देव बोलू लागला तर निबंध मराठी मध्ये
Answers
Answer:
देव बोलू लागला तर मनुष्यआला विचरेल
■■देव बोलू लागला तर!!■■
आपण देवावर खूप विश्वास करतो,देवाची प्रार्थना करतो. आपल्या मनातलं सगळे काही आपण देवाला सांगतो. देव आपल्या प्रत्येकाच्या गोष्टी ऐकतो. पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे की सगळ्यांचा ऐकणारा देव जर आपल्याशी बोलू लागला तर!!
देव बोलू लागला तर, किती मजा येईल.आपल्याला ज्या समस्या आहेत, ते आपण थेट देवाला सांगू शकू. आपल्याला देवासोबत गप्पा मारता येतील. जसे आपण देवाला आपल्या मनातील गोष्टी सांगतो, त्याचप्रकारे देवसुद्धा त्यांच्या मनातील गोष्टी आपल्याला सांगणार.
काही लोक देवाच्या नावावर भल्याबोल्या लोकांना लुबाडतात. देव बोलू लागला तर, तो अशा लोकांना शिक्षा देईल आणि त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला सावध करेन. देव बोलू लागला तर, तो आपल्याला चांगली शिकवण देईल, चांगल्या गोष्टी शिकवेल.
खरंच, देव बोलू लागला तर!, किती बरे होईल.