History, asked by swag33, 9 months ago

दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या शाळेची सहल जव्हारजवळील
आदिवासींच्या पाड्यावर जात आहे. त्या सहलीत सहभागी होण्याची अनुमती
मिळण्यासाठी वडिलांना पत्र पाठवा.​

Answers

Answered by xShreex
4

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

नंदकिशोर राजन दादरकर

विदयार्थी वसतिगृह,

खोली क्रमांक २०१,

विदयानिकेतन, व्हिन्सेंट रस्ता,

माटुंगा, मुंबई - ४०० ०१९.

दि. ३० सप्टेंबर २०१२

प्रिय बाबा,

शि. सा. नमस्कार. वि. वि.

तुमचे पत्र मिळाले. मी खुशाल आहे. माझा अभ्यासही ठीक आहे. पाच ऑक्टोबरपासून माझी सहामाही परीक्षा सुरू होत आहे. माझी अभ्यासाची पूर्ण तयारी आहे. १३ ऑक्टोबरला परीक्षा संपेल.

१४ ऑक्टो. ते २१ ऑक्टोबरपर्यंत आमच्या वर्गाची सहल जव्हारजवळील आदिवासी पाड्यावर जात आहे. आदिवासी लोकांच्या जीवनाची ओळख व्हावी, हा हेतू या सहलीमागे आहे. शिक्षकांनी अभ्यासाचा एक भाग म्हणून मुद्दाम ही सहल आयोजित केली आहे.

तुमची संमती असलेले पत्र मिळाले, तरच मला सहभागी होता येईल. तेव्हा कृपया लवकरात लवकर तुमचे संमती पत्र पाठवा. ती. सौ. आईला माझा शि. सा. नमस्कार.

तुमचा,

नंदू

Similar questions