दिवाळीसाठी विविध प्रकारच्या आकाशकंदिलांचे प्रदर्शन व विक्री, ' पर्यावरणाचा रास करू नका ' हा मोलाचा संदेश – बातमी लेखन करा
Answers
Answer:
पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभीर्याने विचार करून कोणी काही तरी करील यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करा. केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता सजीव सृष्टीसाठी व
बातमी लेखन
Explanation:
"शाळेतील दिवाळी प्रदर्शन कार्यक्रमाची बातमी"
"शारदामंदिर शाळेत दिवाळी प्रदर्शन कार्यक्रम उत्साहाने साजरा"
दिनांक : २४ ऑक्टोबर २०२१, रविवार.
जळगाव: दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी शारदामंदिर शाळेत दिवाळी प्रदर्शन आनंदाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सगळे विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. नंतर मुख्याध्यापकांनी 'दिवाळीत पर्यावरणाचा रास करू नका' या विषयावर भाषण दिले. मग प्रदर्शनाची सुरुवात झाली. दिवाळीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या सजावटीच्या व इतर उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाशकंदिलांच्या प्रदर्शनाला सगळ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पाला बक्षीस देण्यात आले. शाळेच्या शिक्षिकेने कार्यक्रमाला उपस्थितीत सगळ्यांचे आभार प्रकट केले. मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला.