History, asked by shraddhabhure3511, 8 months ago

दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राला अभिनंदन करणारे पत्र liha

Answers

Answered by mad210216
26

पत्र लेखन.

Explanation:

दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राला अभिनंदन करणारे पत्र:

सरस्वती वस्तीगृह,

जैननगर,

जी.के.रोड,

डोंबिवली.

प्रिय मित्र निनाद,

नमस्कार.

कसा आहेस तू? मी इथे ठीक आहे. तू तुझ्या मित्रांसोबत गेल्या आठवड्यात काश्मीर पर्यटनासाठी गेल्याचे मला कळले.

निनाद, काश्मीरला स्वर्ग मानले जाते आणि या स्वर्गाचे दर्शन तू आपल्या मित्र रजनीतला घडवून आणले, या गोष्टीसाठी मला तुझे फार अभिनंदन करायचे आहे.

रजनीत हा दिव्यांग असून, त्याला एका डोळ्याने नीट दिसत नाही. तसेच त्याला कानाने ऐकू येत नाही. म्हणून, तो कोणासोबत सहलीसाठी जात नाही.

परंतु, तू व तुझे मित्र त्याला आनंदाने सहलीसाठी घेऊन गेले आणि त्याची फार काळजी घेऊन त्याला काश्मीरचे दर्शन घडवून आणले.

तुमच्या या कृत्यामुळे मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. असेच इतरांसाठी संवेदनशीलता दाखवत जा आणि मैत्रीचे नाते जपूण ठेव.

तुझा मित्र,

सुनील.

Answered by meghabarad81
1

Explanatio hsgshdbdbshzndsnsjznznz

Similar questions