दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं.
आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून
आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या
होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत
सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला.
‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि
Answers
Answer:उत्तर : कथेचा उत्तरार्ध क्षणाचाही विलंब न लावता आजीने ओळखले- ' हा तर बिट्टू !' बिट्टू आजीच्या जिवलग मैत्रिणीचा मुलगा. शांता अधिकारीचा मुलगा आदित्य ऊर्फ बिट्टू. बिट्टूबद्दल आजी नेहमीच आम्हाला गप्पांत सांगायची. बिटू लहानपणापासूनच हुशार व चुणचुणीत. पहिल्या भेटीत सगळ्यांना आपलंसं करणारा. बोलका, हसतमुख! सर्वांचा लाडका. आनंद वाटणाऱ्या अधिकारींच्या घरावर अचानक एकापाठोपाठ दोन संकटे ओढवली. बिटू दहावीत शिकत असताना त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तर या धक्क्याने पाठोपाठ आईही गेली. बिटूच्या डोक्यावरील मायेचे छत्र काळाने ओढून नेले. बिटू दिशाहीन झाला होता. पण या साऱ्यात बिटूला आजीचा मोठा आधार वाटत होता. आजीनेही त्याला पोटाशी घरले. ऐन दहावीच्या परीक्षेवेळी एवढे मोठे संकट आले. बिटूने आजीच्या आधाराने हिम्मत एकवटली व परीक्षेला सामोरा गेला. पुढे तो आपल्या मावशीकडे राहू लागला. कितीही संकटे आली तरी बिटूने शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. आजीला बिटू आवर्जून पत्र लिहायचा; खुशाली कळवायचा. हळूहळू कामाच्या व्यापात पत्रे रोडावली. आजीला मात्र विटू सतत आठवायचा. त्याची शिक्षणाची तळमळ, मेहनत, डोळ्यातली चमक आजी नेहमी आम्हांला सांगायची. बिटू आता विदेशात एका बड्या कंपनीत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर म्हणून मोठ्या हुद्द्यावर नोकरी करीत आहे. तिथेच स्थायिक झाला आहे. शिक्षणाच्या जोरावर आज त्याने स्वत:ची वेगळी प्रतिमा विदेशातही निर्माण केली आहे. आज बिट्टू बऱ्याच वर्षांनी आजीला भेटला तेव्हा डोळ्यांतल्या आसवांतून जणू कृतज्ञताच व्यक्त करीत होता. आजीने त्याला मायेने जवळ घेतले. "मनाने जोडलेली मायेची नाती आयुष्यभर सोबत राहतात." आजीच्या या वचनाचा अनुभव आम्ही प्रत्यक्षात घेत होतो. बघता बघता आजी आणि बिटू गप्पांत पार बुडून गेले. आमच्या मनात मात्र एकच आवाज घुमत राहिला. 'जीजी... मी आलो गं! १८
Explanation: