Social Sciences, asked by himanshudongre356, 2 months ago

दुय्यम समूहाचा अर्थ सांगून दुय्यम समूहाचे महत्त्व स्पष्ट करा.​

Answers

Answered by thenitishjha
7

Answer:

सामाजिक समूह हि संकल्पना पाहण्यापूर्वी समूह या संकल्पनेचा अर्थ जाणून घेणे आवष्यक आहे. समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत. हे घटक परस्परांच्या सान्निध्यात जरी असले तरी त्यांच्यात संबंध प्रस्थापित होत नाहीत. त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव नसते. एका बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी देखील एका प्रकारचा समूह आहे. परंतु जेव्हा त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा सामाजिक समूह अस्तित्वात येतो.

इतर प्राण्यांच्या व वस्तूंच्या तुलनेत मानवी समूह अत्यंत महत्वाचा मानला जातो याचे प्रमूख कारण म्हणजे मानवामधील परस्पर संबंध प्रस्थापित होत असतात. समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जातात आणि संबंधाची व्यवस्था टिकून राहवी म्हणून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवले जाते.त्यामुळे मानवी समूह व्यक्तीच्या अस्तित्वासाठी समाजाच्या सातत्य व स्थैर्यासाठी अत्यंत आवष्यक आहे. या संकल्पनेची व्याख्या आणि स्वरूप पाहणे अत्यंत आवष्यक आहे.

सामाजिक समूहाची व्याख्या आणि वैषिष्टयेः-

1) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येवून परस्परांना प्रभावित करून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.

2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते.

3) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती ज्या बÚयाच कालावधी करता परस्परांषी संबंधीत असतात व समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे कार्य करतात त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.

  वरील व्याख्येवरून सामाजिक समूहाची काही ठळक वैषिष्टये निदर्षनास येतात. या वैषिष्टयानुसार समूहाचे स्वरूप निदर्षनास येवू शकते.

1) किमान दोन व्यक्तींची आवष्यकताः

सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही. काही वेळा एखादया सभेला उपस्थित असणारी व्यक्ती त्यांच्यात परस्पर संबंध नसले तर त्यांना सामाजिक समूह म्हणता येणार नाही. समूहासाठी किमान दोन व्यक्तींची आवष्यकता आणि दिर्घ कालावधीचे परस्पर संबंध असले पाहिजेत.

2) समान ध्येयः

  सामाजिक समूहामध्ये कुटुंब, मित्र, परिवार, राजकीय पक्ष, कामातील सहकारी इ. चा समावेष झालेला आढळतो या सर्व समूहामध्ये समान ध्येय साध्य केली जातात.

उदा. एखादया राजकीय पक्षातील सर्व सदस्य निवडणूक जिंकून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वेगवेगळया मार्गाचा अवलंब होवू शकतो.

उदा. कुटुंबाचा विकास व्हावा समृद्धी व्हावी सर्व सदस्य आनंदी व सुखी रहावे म्हणून सर्व सदस्य आपआपलया परिने प्रयत्न करून समान ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात.

3) मानसिक एकात्मताः

  सामाजिक समूहातील सदस्यांमध्ये मानसिक दृष्टया एकात्मता आढळते. त्यांच्यात आपलेपणाची भावना दिसून येते. समूहाचा समृद्धीमध्येच आपली समृद्धी आहे. समूहाच्या विकासामध्ये आपला विकास आहे. अषा प्रकारची भावना प्रत्येक सदस्यांची असते.

उदा. कुटुंबामध्ये सर्व सदस्य आपआपल्या परिने प्रयत्न करून कुटुंबाचा विकास करण्याचा प्रयत्न करतात. कारण कुटूंबाच्या विकासातूनच आपला विकास होऊ शकतो. एखादाय सदस्याला आनंद होईल म्हणून इतर सदस्य वैयक्तिक त्याग देखील करतात अषा प्रकारची भावना सामाजिक समूहामध्ये आढळते.

Please mark this answer as brainliest along with giving it 5 star rating.

Thank you

Answered by Ishaan038
0

Answer:

कूले यांनी प्राथमिक समूहातील जी संकल्पना मांडली त्याच्या बरोबर विरोधी परिस्थती ज्या समुहात दिसून येते त्याला दुय्यम समूह असे म्हणतात. हर्टन व हंट या विचारवंतानुसार दुय्यम समुह म्हणजे ज्या समुहात सामाजिक संपर्क हे व्यक्ती निरपेक्ष तुटक व उपयुक्तवादी असतात ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात.ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात ज्याच्यात प्राथमिकता नसते असे दुय्यम स्वरूपाचे संबंध ज्या समुहात आढळतात त्याला दुय्यम समूह असे म्हणतात.

  प्राथमिक समुहाप्रमाणेच दुय्यम समूहात देखील व्यक्ती समान ध्येय साध्य करण्याकरिता एकत्र येतात परंतु त्याच्यातले संबंध हे कामापुरतेच मर्यादित राहतात.

उदा. एखादया कारखान्यामध्ये सर्व कामगार एकत्रितपणे वस्तूचे उत्पादन करण्यासाठी परस्परांच्या संपर्कत येतात कामगार संघटना देखील स्थापन करतात परंतु त्याच्या संबंधात प्राथमिकता दिसत नाही राजकीय पक्ष देखील त्यांतील सदस्य सत्ता मिळविण्यासाठी एकत्र येतील. परंतु, त्याच्यात प्राथमिकता निर्माण होत नाही. याषिवाय शहरी समुदयात अषा प्रकारे संबंध मोठया प्रमाणात आढळतात. व्यक्ती फक्त कामापुरते एकत्र येत असतात काम झाले कि, संबंध विसर्जित होतात. व्यक्तीपेक्षा त्याच्या कार्याला व पदाला महत्त्व असते. त्याला दुय्यम समूह असे म्हणतात ही संकल्पना अधिक समजावून घेण्यासाठी त्याची वैषिष्टये पाहणे आवष्यक आहे.

दुय्यम समूहाची वैषिष्टयेः

1) संबंध अप्रत्यक्ष व्यक्ती निरपेक्ष असतातः

  दुय्यम समूहातील संबंध हे सहकार्याचे असले तरी व्यावहारिक स्वरूपाचे असतात. हे संबंध कामापुरते असतात. काम संपुष्टात आले कि, संबंध संपतात यात व्यक्तिला महत्त्व नसून पदाला असते.

उदा. बँकेतील कर्मचारी व खातेदार यांच्यातील संबंध खातेदाराची अपेक्षा असते कि,आपल्या खात्यातून पैसे मिळावेत बँकेतील कर्मचारी कोण आहे याची त्याला काळजी नसते. मालकदेखील नोकर कोण आहे? याचा विचार न करता आपल्या हाताखाली काम करण्यासाठी एक व्यक्ती आहे ज्याला पैसे दिले की तो काम करतो असा मर्यादित विचार करतो त्यामुळे दुय्यम समुहात संबंध व्यक्ती निरपेक्ष असतात.

2) आकाराचे बंधन नाहीः

प्राथमिक समुहामध्ये सदस्यांत समोरा-समोरचे व व्यक्तीगत संबंध असतात. त्यासाठी आकार लहान असणे आवष्यक आहे परंतु जेथे कामापुरते संबंध आहेत. तेथे आकाराचे कोणतेही बंधन नसते.

3) भौतिक सान्निध्याची आवष्यकता नाहीः

ज्या प्राथमिक समूहात व्यक्तीगत संबंध प्रस्थापित होण्यासाठी भौतिक सान्निध्य आवष्यक असते. असे सान्निध्य दुय्यम समुहात आवष्यक नाही. सदस्य वेगवेगळया प्रसार माध्यमांचा वापर करून परस्परांषी संपर्क साधू शकतात. भौतिक सान्निध्याची आवष्यकता नसते. 

Similar questions