दहावी
इतिहास आणि राज्यशास्त्र
थोड़क्यात उत्तरे लिहा .
Attachments:
Answers
Answered by
3
प्रश्न 1 :
अ) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन' हा एक प्रमुख प्रवाह आहे.
- मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
- मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
- प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो. याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
- मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
प्रश्न २ :
अ) राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे =>
- १८५७ साली भारतात झालेल्या बडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर १८५७ चे स्वातंत्र्यसमर असे पुस्तक लिहिले.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते त्यांचे राष्ट्रवादी
- त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली.
- प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
- दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
प्रश्न ३ :
अ) प्रसारमाध्यमांची आवश्यकता
प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते
- प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते.
- प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो.
- प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते.
- प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत.
प्रश्न ४ :
अ) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
निडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.
- प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते.
- आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो.
- निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
- राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
प्रश्न ५ :
अ) माहितीचा अधिकार :
- शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने २००५ साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला.
- या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत.
- शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.
- माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.
Similar questions
Math,
5 hours ago
English,
5 hours ago
Physics,
5 hours ago
Computer Science,
9 hours ago
Math,
9 hours ago
Social Sciences,
8 months ago
Science,
8 months ago
English,
8 months ago