Biology, asked by namazzisalmah7717, 11 months ago

दहशतवादी हल्ले झाल्यास कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याची यादी तयार करा

Answers

Answered by rupeshwagh85572
67

Explanation:

कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो!

सरकारच्या नावाने खडे फोडले जातात,

मिडियाला शिव्या घातल्या जातात,

अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात,

संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात.

यातले काही घडत नाही किंवा घडू शकत नाही म्हणून मग चरफडत बसणं...

पण या पलिकडे जाऊन,

मी माझ्या परीने अगदी छोट्या पातळीवर दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी काय करू शकतो?

याविषयी माहिती देऊ-घेऊ या.

तुमचा उपाय कितीही साधा सोपा असला असला तरी येथे नक्की द्या.

तुम्ही काय केले हे दिलेत तरी चालेल.

माझ्यापासून सुरुवात करतो - कोणत्याही स्टेशनवर किंवा गाडीत असतांना मी एकदा डब्यावर नजर फिरवतो आणि संशयास्पद बेवारशी वस्तू किंवा हालचाल दिसते आहे हे पाहतो.

ट्रेनच्या डब्यात शिरल्यावर सर्वत्र नजर टाकणे हे सवयीने आता जमू लागले आहे. (हा फार मोठा उपाय नाही पण मी दर वेळी करतो - कारण तो करणे मला शक्य आहे.)

निदान उद्या तरी काहीतरी चांगले होईल असा पॉझिटिव अ‍ॅटिट्यूड ठेवून पुनश्च कामाला लागू शकते आणि अर्थातच सावध राहू शकते. :)

१) आपल्यापैकी जर कोणी भाड्याने घर दिले असेल कोनाला तर त्याची नोंदणी जवळच्या पोलिसस्टेशन मधे करावी. हल्ली चेह-यावरून सभ्य दिसणारे कोणीही दहशदवादी असू शकते.

२) आपल्या परीसरात अथवा आपल्या बिल्डींग मधे जर कोणी नवीन माणूस राहायला आले तरी त्यांची नीट चौकशी करावी. त्यातुनही काही संशयास्पद आढळल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे.

३) मला माहित नाही की हे शक्य आहे की नाही, पण जर असं शक्य असेल तर एक असं मशीन निघायला हवे की ज्याने जवळपास असलेल्या स्फोटकाला सेन्स करावे आणि ताबडतोब अलार्म करावं. असं मशिन प्रत्येक सामान्य माणसाकडे सहज ठेवता येईल (जसा आपण मोबाईल ठेवतो) असे असावे आणि खिशाला परवडणा-या किमतीत असावे.

Similar questions