Hindi, asked by amitbhosale1906, 7 months ago

Thankspls somebody write the essay on wheat (gahu) in marathi

Answers

Answered by Sarbjit310
0

Answer:जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम आहे. आशिया मायनर (आताचा तुर्कस्तान हा देश) गव्हाचे उगमस्थान मानला जातो. तेथे १०,००० ते १५,००० वर्षांपासून गहू पेरला जात असावा असा अंदाज आहे. गहू समशीतोष्ण प्रदेशात पिकतो. जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, चीन, भारत, फ्रान्स, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश गहू उत्पादनात आघाडीवर आहेत.

गव्हाच्या ओंब्या

गव्हाच्या ओंब्या

गहू हे झुबकेदार वर्षायू गवत आहे. कोवळेपणी ही वनस्पती हिरवीगार असते आणि गवतासारखी दिसते. पूर्ण वाढ झालेल्या गव्हाच्या रोपांची उंची ६०-१५० सेंमी. असते. पिकल्यावर ती सोनेरी पिवळीधमक दिसू लागते. मूळ, खोड, पाने आणि स्तबक (कणिश) हे पिकलेल्या वनस्पतीचे मुख्य भाग असतात. तिच्यामध्ये दोन प्रकारची मुळे दिसून येतात; प्राथमिक आणि द्वितीयक. गव्हाच्या बियांपासून ३-५ सेंमी. लांबीची मुळे येतात आणि ती जमिनीखाली असतात. ही मुळे ६-८ आठवडे टिकतात. जमिनीवर जसजशी खोडाची वाढ होते तसतशी खोडाला जमिनीवर द्वितीयक मुळे फुटतात. ही मुळे जाड आणि मजबूत असून त्यांच्यामुळे गव्हाच्या रोपाला भक्कम आधार मिळतो. जमीन जर भुसभुशीत असेल तर ती सु. २०० सेंमी. लांब वाढू शकतात. गव्हाच्या खोडावर ५-६ पेरे असतात. पेरे भरीव असतात. मात्र त्यांमधील कांडे पोकळ असतात. तसेच खोड पानाच्या आवरकांमुळे झाकलेले असते. पाने लांब व अरुंद असून त्यांचे दोन भाग असतात; आवरक आणि पाते. आवरक हा भाग पेर्‍यापासून सुरू होतो व खोडाभोवती वेढलेला असतो. पाते लांब व अरुंद असून त्यावर समांतर शिरा असतात. पाते आणि आवरक जेथे जुळतात तेथे पापुद्र्यासारखा पुढे आलेला भाग असतो त्याला जिव्हिका म्हणतात. पाने खोडावर समोरासमोर असतात. फुलोरा कणिश किंवा ओंबी प्रकारचा असतो. फुलोरा आल्यापासून बी तयार होण्यासाठी ३०-४० दिवस लागतात. दाणे भरीव व आकाराने लंबगोल असून त्यावर एका बाजूला उभी खाच असते. दाणे दोन्ही टोकांना बोथट असतात.

गहू खाण्यासाठी वापरतात. त्याचे पीठ म्हणजे कणीक चवीला गोड लागते. आयुर्वेदाच्या दृष्टीने गहू प्रशीतक, वेदनाहारक, विरेचक, पौष्टिक, शोथशामक आणि कामोत्तेजक आहे. सर्वसाधारण अशक्तपणात गव्हाचे पदार्थ खाण्यासाठी देतात.

गव्हामध्ये ग्लायडीन आणि ग्लुटेनीन ही प्रथिने असतात. पिठात पाणी मिसळल्यानंतर या प्रथिनांपासून ग्लुटेन हे द्रव्य तयार होते. या घटकामुळे कणकेला चिकटपणा येतो.

भारतीय उपखंडातील गव्हापासून पोळ्या, पराठे व खाकरे यांसारखे पदार्थ बनवितात. यूरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पिकणार्‍या गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते. हा गहू पाव बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतो.

Explanation:

Similar questions