'धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाच्या आधारे तुम्हांला समजलेले राशिका मेनेन यांचे गुणविशेष सांगा
Answers
Answer:
राधिका मेनन या धाडसी होत्या त्यांच्यामध्ये नेहमी काहीतरी करून दाखवण्याची हिंमत होती त्या कर्तव्यदक्ष होत्या महत्त्वकांक्षी होत्या
Answer:
राधिका मेनन यांचा जन्म केरळमधील एका गावात झाला. लहानपणापासून धाडसी वृत्ती असल्यामुळे नेहमी काही तरी नवीन करण्याची त्यांची जिद्द असायची. सतत भरकटणे, धाडसी गोष्टी करणे हा त्यांचा लहानपणापासूनच छंद होता.
समुद्रकिनारी भरकटत असताना त्याविषयी त्यांना खूप आकर्षण वाटत असते आणि भविष्यात आपण या क्षेत्रातच काम करावे असे त्यांना वाटे.
त्यांना समुद्री जहाजामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसर या पदाची नोकरी मिळाली. घरापासून लांब राहावे लागले तरी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक नवीन गोष्टी स्वीकारल्या.
पुढे मर्चंट नेव्ही चा कारभार हातात घेऊन पहिल्या महिला अधिकारी झाल्या. अतिशय साहसी वृत्तीमुळे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या आणि संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय सक्षमपणे पार पाडल्या.
कर्तव्यदक्ष, धाडसी ,साहसी आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे व्यक्तित्व फुलले.