धान्य कोणकोणत्या कारणांनी खराब होते
Answers
Answer:
जगभरामध्ये दरवर्षी सुमारे ६० हजार कोटी रुपये किमतीच्या अन्नधान्याचे नुकसान किडींमुळे होते. त्यामुळे उत्पादकता वाढीप्रमाणे साठवणीच्या तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. साठवणीमध्ये आढळणाऱ्या अधिक नुकसानकारक असलेल्या प्राथमीक किडींची माहिती या लेखात वाचायला मिळेल.
मनुष्याच्या आहारामध्ये धान्याचे प्रमाण हे ८० टक्क्यापर्यंत असते. काढणीनंतर धान्याची साठवण प्रामुख्याने खाण्यासाठी, बियाणे याबरोबरच बाजारात अधिक चांगल्या दराच्या अपेक्षेने साठवणूक केली जाते. जगभरात धान्य उत्पादनाच्या १२ % इतके नुकसान शेतामध्ये आलेल्या कीड व रोग मुळे होते. तर कापणी पश्चात साठवणीमध्ये किडींमुळे होणारे नुकसान ३६% आहे. या एकुण ४८% नुकसानीचे विभाजन केले असता २६% कीड व रोग यामुळे, ३३ % तणामुळे, तर १५% धान्याचे नुकसान उंदीर, पक्षी व इतर प्राण्यामुळे होते. किडींचा विचार करता साठवणीच्या काळात प्राथमिक व दुय्यम अशा दोन प्रकारच्या किडीमुळे धान्याचे नुकसान होते. प्राथमिक किडींच्या अळी अवस्थेत दातांची पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्या दाण्यावरील टणक आवरण फोडून धान्याचे नुकसान करू शकतात.
Explanation:
hope it helps you bro have a great day