ध्रुवीय भागात कोणते वारे वाहतात?????
Answers
वारेभूपृष्ठाच्या संदर्भात सरकणाऱ्याहवेस वारा किंवा हवेचा प्रवाह असे संबोधिले जाते. साधारणपणे वातावरणात ऊर्ध्व (उभ्या) दिशेतील प्रवाह अतिमंद असतात. त्यामुळे वातावरणातील क्षैतिज किंवा आडव्या दिशेतील प्रवाहास वारा असे समजले जाते. पृथ्वीवरील असमान तापमानामुळे हवेचा असमान दाब निर्माण होतो आणि असमान दाबामुळे पृथ्वीपृष्ठावर आणि निरनिराळ्या उंचींवर वारा निर्माण होतो. निरनिराळ्या उंचींवरील वाऱ्याची दिशा व गती समजली म्हणजे वातावरणातील वाऱ्यासंबंधी पूर्ण माहिती मिळते. वारा एक सदिश म्हणजे महत्ता व दिशा असलेली राशी आहे. ज्या दिशेकडून वारा येतो ती वाऱ्याची दिशा समजली जाते. ज्या गतीने हवा सरकते त्या गतीस वाऱ्याचा वेग संबोधिले जाते. वाऱ्याची दिशा आणि गती एकसारखी बदलत असतात. हे बदल निरनिराळ्या कालावधींत होत असतात. त्यांचे स्वरूप अतिसूक्ष्म ते अतिस्थूल असते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेस वाऱ्याची दिशा व गती ही दोन्हीही साधारणपणे तीन मिनिटांच्या सरासरी मूल्यावर आधारित असतात. ही तीन मिनिटे ठराविक वेळेच्या आधी घेतली जातात. वारा हा एक महत्त्वाचा वातावरणविज्ञानीय घटक आहे. मानवी जीवनावर त्याचा निरनिराळ्या प्रकारे परिणाम होतो.
वाऱ्याचे मापन
वारे निरनिराळ्या उंचीवर वाहत असतात. भूपृष्ठावरील वाऱ्याची दिशा व गती यांचे मापन करण्याची पद्धती आणि निरनिराळ्या उंचींवरील वाऱ्याची दिशा व गती यांच्या मापनाच्या पद्धती या दोहोंत बराच फरक आहे.
भूपृष्टीय वारे
साधारणपणे भूपृष्ठापासून १० मी. उंचीवर वाऱ्याचे मापन करतात.
दिशामापनदिशामापकावर किंवा दिशादर्शकावर वाऱ्याची दिशा निश्चित केली जाते. दिशामापकावर उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्चिम आणि वायव्य या आठ दिशा दर्शविलेल्या असतात. वारा जर उत्तर व ईशान्य या दोन दिशांमधून येत असेल, तर वाऱ्याची दिशा उत्तर-ईशान्य अशी धरली जाते. अशा प्रकारे उत्तर-ईशान्य, ईशान्य-पूर्व, पूर्व-आग्नेय, आग्नेय-दक्षिण, दक्षिण-नैर्ऋत्य, नैर्ऋत्य-पश्चिम, पश्चिम-वायव्य व वायव्य-उत्तर या आठ उपदिशा आहेत. या सोळा दिशा व उपदिशांत वाऱ्याच्या दिशेचे मापन दिशामापकाच्या साहाय्याने केले जाते. वाऱ्याची दिशा उत्तर दिशेपासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेत जितक्या अंशावर असेल तेवढे अंश म्हणून वाऱ्याच्या दिशेची नोंद केली जाते, उदा., आग्नेय असेल तर १३५०, दक्षिण-नैर्ऋत्य असेल तर २०२० वगैरे.
गतिमापनबऱ्याच पूर्वी गतिमापक (वेगमापक) अस्तित्वात नव्हते. त्या वेळी वाऱ्याची गती बोफर्ट मापप्रमाणाच्या वा कोष्टकाच्या आधारे ठरविली जात असे. हे मापप्रमाण नाविक अधिकारी ⇨ फ्रान्सिस बोफर्ट यांनी १८०५ मध्ये तयार केले. जमिनीवरील पदार्थांवर होणाऱ्या वाऱ्याच्या परिणामांवर हे मापप्रमाण आधारित आहे. ह्याता वाऱ्याला त्याच्या वेगाच्या चढत्या क्रमाप्रमाणे ०, १ ते १२ क्रमांक दिले आहेत. आणि प्रत्येक क्रमांकाच्या वाऱ्याच्या परिणामाचे वर्णन दिले आहे. हे मापप्रमाण कोष्टकात दिले आहे.
पवनवेगमापक निर्माण झाल्यापासून पवनवेगमापकाच्या साहाय्याने तीन मिनिटे कालावधीतील वाऱ्याचा सरासरी वेग मोजला जातो.