Science, asked by revan8, 2 months ago

धातूची भांडी आणि धातूच्या वस्तू यांचा संग्रह करा.​

Answers

Answered by tejaskorde3
3

Explanation:

धातुच्या भांडी आणि धातूच्या विविध वस्तू यांचा संग्रह करा

Answered by poonammishra148218
2

Answer:

स्वयंपाकाची व दैनंदिन घरगुती वापरासाठी लागणारी भांडी तसेच डब्या, डबे, पिपे, सुरया, पुष्पपात्रे यांसारखी कलाकुसरीची व शोभेची भांडी, वायुपात्रे, दुधाच्या आणि इतर खास बरण्या, टूथपेस्ट, औषधे यांसाठी लागणाऱ्या दबणाऱ्या नळ्या इत्यादींसारखी धारक पात्रे यांची माहिती या लेखात दिली आहे. लेखात प्रथम घरगुती भांड्यांची व नंतर धारक पात्रांची माहिती दिलेली असून धारक पात्रे बनविण्याच्या काही पद्धती घरगुती भांडी बनविण्याकरिताही वापरल्या जातात.

Explanation:

Step 1: धातूची भांडी प्रथम स्वयंपाकासाठी वापरली गेली असावीत. आताची बरीच भांडी ही जुन्या भांड्यांसारखी आहेत. उदा., कढ्या, मुठीचे तवे, घागरी वगैरेंसारख्या भांड्याचे आकार विशेष बदलेले आढळत नाहीत. मात्र भांडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या प्रकारांमध्ये व रुपण पद्धतीमध्ये (धातूला इष्ट आकार देण्याच्या पद्धतीमध्ये) बदल होत गेलेले दिसतात. भांड्यांसाठी मानवाने प्रथम तांब्याचा वापर केला. नंतर कासे (ब्राँझ), पितळ व लोखंड यांची भांडी वापरात आली.

Step 2: अपारदर्शक काचेचा धातूच्या पृष्ठावर एकजीव असा थर दिलेली [⟶ एनॅमल] भांडी लोकप्रिय होती. मात्र तांबे व  पितळ यांच्या भांड्यांना कल्हई करावी लागते व लोखंडाची भांडी जड असतात व ती गंजतातही. त्यामुळे हलक्या, कमी गंजणाऱ्या व उष्णतेची चांगली संवाहक असलेल्या अशा ॲल्युमिनियमाची भांडी सर्वत्र लवकरच प्रचारात आली. तदनंतर विसाव्या शतकात अगंज पोलादांच्या (स्टेनलेस स्टीलच्या) भांड्यानी तर घरगुती भांड्यांमध्ये क्रांतीच घडवून आणली आहे. कारण सर्वसाधारण अन्नपदार्थामुळे ही पोलादे गंजत नाहीत. कधीकधी अशा भांड्यांच्या तळाला तांब्याचा लेप देतात. त्यामुळे भांड्यास मिळणारी उष्णता लगेचच सर्वत्र एकसारखी पसरली जाऊन पदार्थ करपण्याची शक्यता कमी होते.

Step 3: इ.स.पू पाचव्या शतकात इराणमध्ये ॲकिमेनिडकालीन विविध आकारांची सोन्या-चांदीचे पेले, लहान वाडगे, फुलदाण्या इ. भांडी सापडली आहेत. ग्रीक, इट्रुस्कन व फिनिशियन लोकांनी तयार केलेली इ.स. पू. पाचव्या शतकातील कलाकुसरयुक्त चांदीची भांडी सापडली आहेत तसेच इट्रुस्कन थडग्यात इ. स. पू. चौथ्या शतकातील चांदीची भांडी सापडली आहेत.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/22790656?referrer=searchResults

https://brainly.in/question/44027330?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions