ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत कोणते आहेत ते कमी करण्याचे उपाय स्पष्ट
Answers
Answer:
ध्वनी प्रदूषण म्हणजे असा कुठलाही आवाज जो मर्यादेपेक्षा जास्त असतो .तो आवाज मानवी कानाला सहन होत नाही. व त्यामुळे असह्य अशा वेदना होतात त्याला ध्वनिप्रदूषण असे म्हणता येईल.
Step-by-step explanation:
ध्वनी प्रदूषणाचे अनेक स्त्रोत आहेत, ते खालील प्रमाणे:
१. वाहनांचे मोठमोठ्याने वाजणारे हॉर्न ध्वनि प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.
२. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये किंवा उत्सवांमध्ये जोरात वाजणारे संगीत किंवा डीजे.
३. दूरदर्शन संच किंवा संगीत संच यांच्या प्रमाणापेक्षा जास्त आवाज .
४. रुग्णवाहिका, पोलिसांची गाडी अग्निशामक दलाची गाडी अशा वाहनांवर जे सायरन बसवले असते त्यामुळे ही प्रदूषण होते.
५. औद्योगिक मिलांमध्ये वाजणारे भोंगे किंवा जहाजांमध्ये होणारे आवाज.
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येतात.
१. अनावश्यक वाहनांचे हॉर्न वाजवणे थांबवणे.
२. दवाखाना शाळा महाविद्यालय येथे कमीत कमी वाहनांचा हॉर्न वाजवणे.
३. रुग्णवाहिका अग्निशामक दलाच्या गाड्या यांच्या सायरनचा आवाज थोडा कमी करणे.
४. उत्सव सण साजरा करताना कमीत कमी आवाजात वाद्य वाजतील याची काळजी घेणे.
५. फटाक्यांचा वापर शक्यतो टाळणे किंवा कमीत कमी करणे.
६. लहान मुले व वृद्ध व्यक्ती असतील तर टेलिव्हिजन संच रेडिओ यांचा आवाज कमीत कमी ठेवणे.
७. सामुदायिक ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळणे.
Answer:
Step-by-step explanation: