ध्वनी प्रदुषण मराठी भाषा
Answers
Answer:
मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक (मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज) यांच्यामुळे निर्माण होत असतो. शहरी नियोजनात त्रुटी असल्यास ध्वनी प्रदूषणात वाढ होते. तसेच औद्योगिक क्षेत्रे आणि निवासाची ठिकाणे एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात ध्वनी प्रदूषण जाणवते
Answer:
हल्ली ध्वनी प्रदूषण प्रचंड वाढले आहे. शहरात तर माणसाला एकही दिवस शांत झोप लागत नाही. सर्वत्र माणसाचा कोलाहल माजलेला असतो. त्यात वाहनाच्या व ध्वनीनिपक्षांच्या आवाजाची भर पडली आहे. रेडिओ दूरदर्शन वरील कार्यक्रमाचा आवाज तर अगदी असह्य झाला आहे. हे सर्व भयंकर आहे.
हल्ली ध्वनी प्रदूषण प्रचंड वाढले आहे. शहरात तर माणसाला एकही दिवस शांत झोप लागत नाही. सर्वत्र माणसाचा कोलाहल माजलेला असतो. त्यात वाहनाच्या व ध्वनीनिपक्षांच्या आवाजाची भर पडली आहे. रेडिओ दूरदर्शन वरील कार्यक्रमाचा आवाज तर अगदी असह्य झाला आहे. हे सर्व भयंकर आहे. या ध्वनिप्रदूषणामुळे आपण नीट अभ्यास करू शकत नाही. आपले काम शांतपणे करू शकत नाही. आपल्याला शांत झोप मिळू शकत नाही. लहान मुलांना, आजारी व वृद्ध माणसांना याचा बेसुमार त्रास होतो. काही माणसे तर आजारी पडतात. काही जणांना चक्कर येते. शास्त्रज्ञांच्या मते, ध्वनिप्रदूषणामुळे माणसे बहिरी होतील. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपण हळू आवाजात बोलावे. घरातील रेडिओचा व दूरदर्शन संचाचा आवाज लहान ठेवावा. ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजात कधीच लावू नये. आपण आतापासूनच या सवयी लावून घ्यायला हव्यात.