ध्याय-२:
१. पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा:
(१) मैदान गाजवणे :
(२) एका पायावर तयार असणे :
३) कपाळावर आठ्या पसरणे :
४) मन खट्टू होणे :-
Answers
Answered by
4
Answer:
- सचिन तेंडुलकर बराच काळ क्रिकेटचे मैदान गाजवले.
- कुठल्याही कामात राजू एका पायावर तयार असतो.
- कारल्याची भाजी पाहिली की माझ्या कपाळावर आठ्या पसरतात.
- सहलीला जाण्याची परवानगी बाबांनी दिली नाही म्हणून राजूचे मन खट्टू झाले.
Answered by
3
Answer:
दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ एका विशिष्ट शब्दात सांगणे म्हणजे वाक्यप्रचार होय .
खेळात प्राविण्य मिळवणे म्हणजे मैदान गाजवणे.
- नीतिनने क्रिकेटचा खेळ खेळून मैदान गाजवले.
- विराट कोहली मैदानावर खेळायला आला की समजायचे तो मैदान गाजवणारच.
कुठलीही गोष्ट करण्यासाठी लगेच तयार होणे म्हणजे एका पायावर तयार असणे.
- महेश कुठलेही काम करण्यासाठी एका पायावर तयार असतो.
- सरांनी निलीमाला कुठलेही काम करायला दिले ते करण्यासाठी ती एका पायावर तयार असते.
नाराजी दिसणे म्हणजे कपाळावर आठ्या पसरणे.
- गुरुजींनी गृहपाठ दिल्यावर निलेशच्या कपाळावर आठ्या पसरतात.
- कारल्याची भाजी समोर येतातच सीमाच्या कपाळावर आठ्या पसरतात.
खूप वाईट वाटणे म्हणजे मन खट्टू होणे.
- बाबांनी रितेशला नवीन सायकल न घेतल्यामुळे रितेशचे मन खट्टू झाले.
- आई-बाबांनी सोहनला सहलीला जाण्याची परवानगी न दिल्यामुळे सोहनचे मन खट्टू झाले.
Similar questions