Political Science, asked by baluramavath899, 10 months ago

धर्मनिरपेक्षतेवर टीप लिहा.

Answers

Answered by SnehaG
5

<b>hello!!!

HERE IS UR ANSWER

धर्मनिरपेक्ष भारत! धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? सर्व धर्मांना समान वागणूक देणे, धर्माधर्मात कोणताही भेदभाव न करणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता असा मी समजतो, पण काय खरच आपण धर्मनिरपेक्ष आहोत? आपली धर्मनिरपेक्षतेची नेमकी व्याख्या काय? काय एका धर्माच्या सुखासाठी दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता? कि, निवडणुकीत मते मिळवण्यासाठी एखाद्या विशिष्ट धर्माला सोयीसवलती देत बाकी धर्माच्या अधिकाराची किवा गुणवत्तेची पायमल्ली करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता काय?

माझ्या मते आपल्या देशात अजिबात धर्मनिरपेक्षता नाही, उलट जगात सगळ्यात या गोष्टीचा जर कोणी फायदा घेत असेल तो आपला देश. आपल्या घटनेने जरी आपल्याला धर्मनिरपेक्षता आणि अहिंसा असा संदेश दिला असला, तरी त्या थोर घटनाकारांच्या विचारांचा आपण आपल्याला हवा तसा सोयीस्कर अर्थ काढून किंबहुना घटनेचा आपल्याला हवा तसा वापर करून घेत असतो.

आपल्या देशाला जाती-धर्माचे राजकारण नवीन नाही, अजून खोलात जाऊन विचार केला तर, आपल्याकडे विकासाच्या मुद्यावर राजकीय युद्ध न खेळता, जाती-धर्माच्या नावावर राजकारण कारण जास्त सोप्प आहे. आणि तो पर्याय आपले राजकीय पक्ष अत्यंत यशस्वीपणे वापरतात. स्वताला धर्म निरपेक्ष म्हणवून घेणारे हे पक्षच सर्वाधिक प्रमाणात धार्मिक भावनांचे गलिच्छ राजकारण करत सत्ता उपभोगतात. खर सांगायचा तर आपल्या देशाचा सर्व राजकारण धर्म आणि जातिभेदाभोवती फिरत असत. आपल्या प्रत्येक नेत्याला एखाद्या विशिष्ट धर्माचे किवा जातीचे नेतृत्व म्हणूनच बघितलं जात, त्यामुळे आपल्याकडे राष्ट्र भावना, राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय विकास, राष्ट्र गौरव या गोष्टी दुय्यम ठरवून आरक्षण, सवलती, प्रादेशिक वाद या गोष्टींचा जास्त बोलबाला असतो. आणि त्याचमुळे हि राजकीय परिस्थिती इतकी भयानक होत चालली आहे कि, आज एकविसाव्या शतकातहि आपण हिंदू-मुस्लीम, ब्राम्हण-मराठा, उच्च कुळ-नीच कुळ अश्या गोष्टींमध्ये अडकून पडलो आहोत, आपल्या धर्मा बद्दल जातीबद्दल आदर असावा नव्हे तो असायलाच पाहिजे, पण तो आदर, अभिमान बाळगताना त्याचा फायदा या गलिच्छ राजकारणाला होत तर नाही ना याचाही विचार करायला हवा. नुसते आम्ही धर्मनिरपेक्ष, आम्ही सर्वांना समान वागणूक देतो हे दाखवण्यासाठी हिंदू धर्माचा हिंदुस्थानात तिरस्कार करून इतर धर्मापुढे लाळघोटेपणा करणे, हि चूक राजकीय पक्षांनी करू नये. त्यापेक्षा विकासाकडे लक्ष दिले तर त्याचा फायदा अधिक होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो धर्मनिरपेक्ष कोणीच असू शकत नाही, स्वधर्म बद्दल आदर असणे, प्रेम असणे हा मानवाचा नैसर्गिक गुणधर्म आहे, हा ज्यांचे मूळ एका विशिष्ट धर्माचे नसेल ते कधीच कोणत्या एका धर्माचा अभिमान बाळगू शकत नाहीत, त्याचा ओढा कायम भलतीकडेच असतो, असे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष दाखवायचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या भावनिक मुद्याला हात घालून आपला वापर करतात. हेच लोक सर्वाधिक धर्मांध असतात असं मला वाटतं, कारण त्यांचा धर्म सत्ता, पैसा आणि ताकद हेच असतं. त्यांच्या या खेळीला उत्तर देण्याची ताकद तुमच्या आमच्यात आहे. फक्त त्यासाठी हा वरवरचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडून टाका. आणि स्वधर्मचा अभिमान ठेवा, म्हणजे या धर्मनिरपेक्षतावादी लोकांचे खोटेपणाचे बुरखे आपोआप गळून पडतील…

मी माझी मतं मांडायला घाबरत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर खरं बोलायला घाबरत नसाल तर बिनधास्त तुमची पण प्रतिक्रिया द्या.

Answered by r5134497
4

धर्मनिरपेक्षतेवर

स्पष्टीकरण:

“सेक्युलर” या शब्दाचा अर्थ धर्मापेक्षा "वेगळा" असणे किंवा कोणताही धार्मिक आधार नसणे होय. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे जीवनातील राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंपासून धर्म वेगळे करणे. तर धर्म ही केवळ एक वैयक्तिक वैयक्तिक बाब आहे. हे सर्व धर्मांना संपूर्ण स्वातंत्र्य आणि सर्व धर्मांचे सहिष्णुता प्रदान करते. सर्व धर्माच्या अनुयायांना समान संधी मिळावी यासाठीदेखील याकडे कल आहे. तर, धर्माच्या कारणास्तव कोणताही भेदभाव आणि पक्षपात नाही.

धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व:

धर्मनिरपेक्षता ही कोणत्याही लोकशाही देशातील महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. हे आम्हाला असे काही फायदे देण्यास मदत करते जसे की:

धार्मिक स्वातंत्र्य

धर्मनिरपेक्ष राज्यात जगण्याचे अनेक फायदे आहेत. धार्मिक स्वातंत्र्य त्यापैकी एक आहे. लोक त्यांच्या आवडीच्या धर्माचे अनुसरण करण्यास प्रतिबंधित आहेत किंवा कोणतेही अनुसरण करत नाहीत.

योग्य निर्णय घेणे

धार्मिक गटांमधून राज्याचे स्वातंत्र्य निश्चितपणे योग्य निर्णय घेते. हे सर्व धार्मिक आणि बिगर धार्मिक गटांना समान वागणूक प्रदान करते. कोणताही धार्मिक समुदाय त्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी राज्यावर दबाव आणू शकत नाही.

बोलण्याचे स्वातंत्र

धर्मनिरपेक्षतेची विचारसरणी लोकांना मोकळेपणाने आपली मते आणि श्रद्धा व्यक्त करण्यास देखील अनुमती देते. धर्मनिरपेक्ष राज्यातल्याप्रमाणे कोणताही धार्मिक गट वर्चस्वाचा दबाव लागू करू शकत नाही. यामुळे बोलण्याच्या अधिकारावर वाढता परिणाम होत आहे.

हे समजून घेण्याची गरज आहे की कोणत्याही पुस्तकांमध्ये केवळ धर्मशास्त्रात धर्मनिरपेक्षतेने लिहिलेले धर्म असू शकत नाही. अशा प्रकारे संपूर्ण विचारधारे कृपेने ओळखली जावी आणि सर्व लोकांना समान प्रमाणात लागू करावी लागेल. दरम्यान, सत्ता मिळविण्यासाठी धार्मिक गटांच्या कोणत्याही अन्यायकारक प्रथेसाठी सरकारी संस्थांवर लक्ष ठेवणे.

म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने लिंग, धर्म, बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक इत्यादी गोष्टींचा विचार न करता कायद्याच्या अधीन राहून सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे तरुण पिढीला वैचारिकतेबद्दल प्रशिक्षण दिले पाहिजे.

Similar questions