Science, asked by Destroyer5163, 11 months ago

धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय? तो स्पष्ट करा.

Answers

Answered by vaishu1012
1
कोयना धरण १९६३ साली पूर्ण झालं. त्यात पाणी अडवणं सुरू झालं. पाठोपाठ तिथं भूकंपांची संख्या वाढल्याचं लक्षात आलं. चारच वर्षांनी तिथं महाराष्ट्रातला तोपर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला.रिश्टर मापनावर ६.५ इतका. मग चर्चा सुरू झाली,धरण आणि भूकंप यांच्या संबंधाची. खरंच त्यांचा एकमेकांशी सबंध आहे? की त्याला ओढून ताणून जोडलेला बादरायण संबंध म्हणायचं??
भूकंप आणि धरण यांचा संबंध हा वादग्रस्त विषय.त्यात थेट दोन टोकाची मतं मांडली जातात. हे या ध्रुवावर, तर ते त्या ध्रुवावर.. अधे मधे कोणीच नाही.कुठून निर्माण झाला हा वाद?? त्याची पार्श्वभूमी रंजक तर आहेच, काहीशी रहस्यमयसुद्धा. जगाच्या इतर भागात तोपर्यंत हा विषय होताच. पण महाराष्ट्रात आला, १९६७ नंतर. त्या वर्षी ११ डिसेंबरला कोयना धरणाचा परिसर भूकंपामुळे हादरला. जमीन हादरलीच, त्याच्या जोडीने अनेक भूशास्त्रज्ञसुद्धा !कारण या भूकंपाने अभ्यासकांच्या तेव्हापर्यंतच्या समजुतीला मोठा धक्का दिला होता.

या भूकंपाच्या आधी असे समजले जात होते की,भारताच्या द्वीपकल्पीय भागात मोठ्या भूकंपाची शक्यता नाही. हा द्वीपकल्पीय भाग म्हणजे मध्य भारतापासून दक्षिणेला असलेला साधारणत: त्रिकोणी आकाराचा भूभाग. त्यात आपला महाराष्ट्रसुद्धा येतो.हा भाग प्राचीन काळातील कठीण खडकांपासून बनलेला आहे. तिथं भूकवचाची प्रमुख कमकुवत क्षेत्रं नाहीत. त्यामुळे तिथं मोठ्या भूकंपाला वावच नाही,असे मानले जात होते. मात्र, १९६७ च्या भूकंपाने या समजुतीला मुळापासूनच हादरा दिला.

Similar questions